Tendu Benefits: आरोग्यदायी तेंदूची फळे, पाने आणि बिया

Health Benefits: तेंदू हे एक बहुपयोगी आणि पोषणमूल्यांनी समृद्ध फळ आहे. याच्या फळांपासून ते पानांपर्यंत अनेक औषधी गुणधर्म असून पचनसंस्थेपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत लाभदायक ठरते. तेंदूच्या फळांचा उपयोग खाद्य पदार्थ, औषधीय उपाय आणि पारंपरिक उपचारांमध्ये केला जातो.
Tendu
TenduAgrowon
Published on
Updated on

सुहासिनी केदारे, डॉ. आर. बी. क्षीरसागर

Natural Remedies with Tendu: तेंदू वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतो. हा वृक्ष उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांमध्ये, कमी पावसाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वाढतो. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात तेंदू वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. औषधीय गुणधर्मांमुळे पारंपरिक उपचार पद्धतीत वापर केला जातो. आदिवासी समुदायांमध्ये फुले, फळे, पाने, बिया आणि सालाचा वापर केला जातो. महाराष्ट्रात तेंदू वृक्ष उष्ण आणि आद्र हवामानात चांगला वाढतो.

या वृक्षाचा हंगाम साधारणतः मार्च ते जून महिन्यांदरम्यान फूल आणि फळांचे उत्पादन होते. एप्रिल ते मे दरम्यान फळे सर्वाधिक उन्हाळ्यात परिपक्व होतात. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगड सारख्या भागांमध्ये तेंदू वृक्षाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. तेंदूच्या फळांचा वापर स्थानिक बाजारात विक्रीसाठी केला जातो. बिया औद्योगिक उत्पादनामध्ये वापरल्या जातात.

पाने : पारंपरिक पॅकिंग उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. तंबाखूचे पॅकेट किंवा अन्य उत्पादने पॅक करण्यासाठी तेंदूच्या पानांचा वापर होतो.

फळे : फळांमध्ये पोषणतत्त्व आहेत. याची निर्यात काही प्रमाणात केली जाते. तेंदू फळांचा वापर खाद्य उद्योगामध्ये केला जातो. चहा किंवा पेय तयार करण्यासाठी वापरले जातात.

खाद्य उपयोग : ताज्या तेंदू फळांचे सेवन पचन सुधारते, शरीराला ताजेतवाने ठेवते. फळे स्वच्छ करून गूळ किंवा हळद घालून खाण्यासाठी वापरतात. फळांच्या काढ्याचा उपयोग सर्दी आणि कफ कमी करण्यासाठी करतात.

Tendu
Tendu Leaves : जंगलात शोधता मिळेना तेंदूपत्ता

औषधी उपयोग : पानांचा काढा सर्दी, कफ आणि अतिसारासारख्या पाचनविकारांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो. साल डायरिया आणि अन्नपचनातील अडचणींवर उपाय म्हणून वापरले जाते. फळे त्वचेच्या विकारांवर उपयुक्त आहेत. फळ, पान आणि बिया पारंपरिक औषधांमध्ये वापर करतात. याचे औषधी उपयोग आरोग्य सुधारण्यासाठी आणि अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. तेंदू फळातील तंतुमय घटक पचनसंस्थेला उपयुक्त ठरतात. पचनविकार आणि अपचन कमी करण्यात मदत करतात.

तेंदू फळात असलेले अँटिऑक्सिडन्ट्स मुक्त कण नष्ट करतात, ज्यामुळे वृद्धत्वाच्या लक्षणांवर नियंत्रण मिळवता येते. हृदयरोग, कर्करोग इत्यादींपासून संरक्षण मिळते. तेंदू पानांच्या सेवनाने शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. पानांचा काढा ज्वर आणि ताप कमी करण्यासाठी वापरतात. हा काढा शरीरातील उष्णता कमी करण्यास उपयुक्त आहे. पातळ रक्ताची समस्या सोडवण्यासाठी आणि रक्तस्राव कमी करण्यासाठी फळाचा वापर होतो.

यामुळे पाचक प्रणाली मजबूत होते. तेंदू फळ आणि पानांमध्ये जंतूनाशक गुणधर्म असतात, जे शरीरातील जंतू आणि विषाणूंचा नाश करण्यात मदत करतात. फळाचा रस त्वचेवर लावल्याने संक्रमण कमी होते. केसांच्या समस्यांवर उपयुक्त आहे. फळात असलेले पोटॅशिअम हृदयाची कार्यप्रणाली सुधारते, रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते, हृदयविकारांचा धोका कमी करते.

हस्तकलेमध्ये वापर : लाकडाची टणकता आणि टिकाऊपणा विविध उत्पादनांसाठी उपयुक्त ठरतो. लाकूड हस्तकला उत्पादनांसाठी वापरतात.

Tendu
Tendu Leaf Business : खानदेशात तेंदू पत्ता व्यवसाय अडचणीत

फळातील पोषणतत्त्व

कार्बोहायड्रेट्स : फळात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला ऊर्जा पुरवतात.

प्रथिने : फळांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जरी कमी असले तरी, ते शरीराच्या पोषणासाठी महत्त्वपूर्ण असतात.

स्निग्ध पदार्थ : फळांमध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे वजन नियंत्रणासाठी ते उपयुक्त ठरतात.

तंतुमय घटक : हे घटक पचन सुधारण्यासाठी आणि शरीरात रक्ताच्या प्रवाहात सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात.

जीवनसत्त्व क : फळात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

खनिजे: कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह हाडे आणि रक्ताच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

- सुहासिनी केदारे, ९३५९००१९२८

(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com