Summer Heat : अवकाळीमुळे ३.८ अंश सेल्सिअसने उतरला पारा

Unseasonal Rain : कधी उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअस पार तर कधी अवकाळी पावसाची वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लागत आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

Solapur News : सोलापूर शहर व परिसराच्या तापमानात सध्या कमालीचा बदल होत आहे. कधी उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअस पार तर कधी अवकाळी पावसाची वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लागत आहे.

एकाच आठवड्यात वातावरणात कमालीचा बदल होताना दिसत आहे. कालच्या तुलनेत आज सोलापूरच्या तापमानात ३.८ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे आज सोलापुरात उन्हाचा चटका कमी होता.

उन्हाचा चटका कमी झाला असला तरीही वातावरणातील उकाडा मात्र कायम होता. सायंकाळनंतर ढगाळ वातावरण झाल्याने अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली होती. गुरुवारी सकाळी साडेआठ ते शुक्रवारी सकाळी साडेआठ या चोवीस तासांमध्ये सोलापूर शहर व परिसरात ४.५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. रात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावतो आणि दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका आणि उकाडा वाढतो, असा अनुभव आता सोलापुरकरांना येऊ लागला आहे.

Weather Update
Unseasonal rain : राज्याला चांदा ते बांदा अवकाळीने झोडपले; शेतकरी हवालदील

१५ एप्रिलला ४०.६ अंश सेल्सिअस, १६ एप्रिलला ४१.७, १७ एप्रिलला ४२.६ तर १८ एप्रिलला ४२ अंश सेल्सिअसची नोंद सोलापूर शहर व परिसरात झाली होती. मागील चार दिवस सोलापूरच्या तापमानाचा पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिला आहे.

Weather Update
Unseasonal Rain : पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू बागांवर संकट

आज सोलापूरच्या तापमानात ३.८ अंश सेल्सिअसची घट झाली असून आज सोलापुरात ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. एकाच आठवड्यात उच्चांकी तापमान आणि अवकाळी पाऊस असे संमिश्र वातावरण होऊ लागल्याने सर्दी, खोकला, घसा दुखणे या सारखे विकार उद्भवू लागले आहेत.

पुढील काही दिवस असेच वातावरण

सोलापूर शहर व परिसरात पुढील काही दिवस असेच अवकाळी, ढगाळ व तापमानाचा पारा असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. सोलापुरात २० ते २५ एप्रिल दरम्यान ३९ ते ४१ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याची व या काळात ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com