Western Maharashtra Solar : पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा

Solar Power : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे.
Agriculture Solar Energy
Agriculture Solar Energyagrowon
Published on
Updated on

Solar Power Project Farmer Benefits : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील पहिला तीन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील हरोली येथे अवघ्या ६ महिन्यात कार्यान्वित झाला. या प्रकल्पामुळे शिरोळ तालुक्यातील हरोली व जांभळी या गावांतील ७९० शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे.

याबाबत महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर म्हणाले की, वीज ग्राहक व शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प हे फायद्याचे असून यामुळे शेतीकरता दिवसा वीज मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागणार आहेत. दोन्ही जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा असे काटकर म्हणाले.

कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजना राबविण्यात येत आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (दि.०५) रोजी वाशिम जिल्ह्यातून दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले. यामध्ये हरोली (जि. कोल्हापूर) येथील प्रकल्पाचाही समावेश होता.

Agriculture Solar Energy
Animal Market Kolhapur : कोल्हापूरच्या जनावर बाजारात ३ कोटींची उलाढाल; खिलार बैलजोड ९ लाखांना विक्री

कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर म्हणाले की, योजना चांगली आहे. परंतु, जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या योजनेला म्हणावा तसा शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. या पंपाच्या संचासाठी जागा भरपूर लागते. त्यामुळे आधीच कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांसमोर हा संच बसवायचा कोठे? असा प्रश्न असल्याचे पाटील यांनी मत व्यक्त केले.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ८८ प्रकल्प प्रस्तावित

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ५४ ठिकाणी (एकूण क्षमता १७० मेगावॅट) व सांगली जिल्ह्यात ३४ ठिकाणी (एकूण क्षमता २०७ मेगावॅट) सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांची एकत्रित क्षमता ३७७ मेगावॅट आहे. या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ७५ कृषी वाहीन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारी देखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com