Farmers Justice: बांधावरच्या न्यायातून रस्ते मोकळे; तहसीलदार महेश सावंत यांच्या पुढाकाराने २० दिवसांत ६ वाद मिटले!

Tehsildar Mahesh Sawant: ग्रामीण भागात वेगवेगळ्या कारणाने रस्त्याचे वाद असतात. रस्ते अडवल्याने त्याचे मानसिक, आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावा लागतो. त्यामुळे प्रलंबित वाद मिटवण्यासाठी कोपरगाव तालुक्यात तहसीलदार महेश सावंत यांच्या पुढाकाराने बांधावरचा न्याय उपक्रम सुरू केला आहे.
Tehsildar Mahesh Sawant
Tehsildar Mahesh Sawant Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: ग्रामीण भागात वेगवेगळ्या कारणाने रस्त्याचे वाद असतात. रस्ते अडवल्याने त्याचे मानसिक, आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावा लागतो. त्यामुळे प्रलंबित वाद मिटवण्यासाठी कोपरगाव तालुक्यात तहसीलदार महेश सावंत यांच्या पुढाकाराने बांधावरचा न्याय उपक्रम सुरू केला आहे. यातून वीस दिवसांत तडजोडीतून सहा रस्ते खुले करत कायमचे वाद मिटवले आहेत. शेतकऱ्यांतूनही या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

ग्रामीण भागात बांद रस्ते, गावांतील वेगवेगळ्या रस्त्याचे प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. अनेक गावांत सरकारी नकाशावर असलेल्या रस्त्यावर अतिक्रमणे आहेत. खासगी परंतु पारंपरिक वहिवाटीचे रस्तेही वैयक्तिक, आर्थिक, भावकी व अन्य वेगवेगळ्या कारणाने अडवली जातात. शासनाकडून त्यासाठी राजस्व अभियान राबवले जात आहे. यातून रस्ते मोकळे केले जात असले तरी काही ठिकाणी रस्त्याचे वाद मिटवण्याला अडचणी येत आहेत.

Tehsildar Mahesh Sawant
Onion Farmer Issue : केंद्राच्या अस्थिर धोरणाने कांद्याची चहूबाजूने कोंडी, शेतकऱ्यांची स्थिती गंभीर!

शेतीत जाण्यासाठी अथवा वहिवाटीसाठी रस्त्याची प्रत्येकालाच गरज असतानाही केवळ गैरसमजुतीतून रस्ते अडवल्याने त्याचा त्रास सगळ्यांनाच सोसावा लागत असून त्यामुळे आर्थिक, मानसिक नुकसान होते. वेळही वाया जातो. त्याचा कौटुंबिक, वैयक्तिक जीवनावर परिणाम होत असून कौटुंबिक प्रगतीला असे वाद मोठे अडथळे ठरत असल्याचे दिसत आहे.

तहसील कार्यालयाकडे प्रलंबित रस्त्याच्या वादाची प्रकरणे आहेत. त्याबाबत स्वतः सावंत संबंधित ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत, वादाचे कारण समजून घेत व दोन्ही बाजूंच्या लोकांना एकत्रित करुन आपसात तडजोडीतून जागेवरच वाद मिटवला जात आहे.

Tehsildar Mahesh Sawant
Farmer Issue : सरकारी योजनांसाठी धोंडिबाची वणवण

जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या आदेशाने सावंत यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला लोकांचाही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी, संवत्सर, सिरसगाव, शहाजापूर आदी गावांत सुमारे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सहा रस्त्याचे वाद जागेवर मिटवत पंचनामे करत व दोन्ही बाजूंचे समझोते करत रस्ते खुले केले आहेत. दोन दिवसांपूर्वी सिरसगाव येथे सुमारे ३८ कुटुंबाला अडथळा ठरत असलेल्या रस्त्याचा वाद मिटवला आहे.

ग्रामीण भागात अत्यंत क्षुल्लक व किरकोळ कारणावरून रस्त्याचे वाद निर्माण होतात. त्यामुळे वहिवाटीला अडथळे येतातच, पण अनेक कुटुंबात कटुता निर्माण होतो. आर्थिक आणि मानसिक नुकसान तर होतेच, पण प्रगतीला अडथळे येतात. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाने आपसातील तडजोडीतून बांधावरचा न्याय उपक्रम सुरू केला आहे. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त वाद मिटवून लोकांचे होणारे नुकसान टाळणार आहोत.
महेश सावंत, तहसीलदार, कोपरगाव (जि. अहिल्यानगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com