Onion Processing : कांदा प्रक्रिया उद्योगातील तंत्र

Food Technology : कांद्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. कांद्यातील फ्लेव्होनॉइड, सल्फर, फाईसेटिन हे घटक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
Onion Processing
Onion Processing Agrowon
Published on
Updated on

राजेश्वरी कातखडे, डॉ. व्ही. डी. सुर्वे

Agro-Industry :

कांद्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. कांद्यातील फ्लेव्होनॉइड, सल्फर, फाईसेटिन हे घटक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. कांद्यापासून पावडर, लोणचे, पेस्ट, सॉस असे विविध पदार्थ तयार करता येतात. या पदार्थांच्या निर्मितीसाठी विविध यंत्रे उपलब्ध आहेत.

कांद्याचे आरोग्यदायी फायदे मोठ्या प्रमाणात आहेत. शहरी बाजारपेठेत कांद्यापासून तयार केलेल्या प्रक्रिया पदार्थांना चांगली मागणी आहे. कांद्याच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते.

पावडर

चकत्या बनविण्यासाठी पांढरा कांदा वापरतात. लहान मानेचा कांदा हा प्रक्रिया करण्यासाठी सर्वात चांगला असतो.

कांद्याचा टोकाच्या बाजूचा भाग कापून साल काढून साधारण १० मिमी जाडीच्या चकत्या कराव्यात. चकत्या मिठाच्या पाण्यात भिजवाव्यात.

तयार चकत्या अंदाजे ५५ ते ६५ अंश सेल्सिअस तापमानात ड्रायरमध्ये १२ तास ठेवतात.

प्रक्रिया केलेल्या चकत्या हवाबंद डब्यात पॅक करतात. ग्राइंडरच्या साह्याने वाळविलेल्या कांद्याच्या चकत्यांची पावडर केली जाते.

Onion Processing
Onion Processing : महिला शेतकऱ्यांनी कांदा प्रक्रियेतून संधी निर्माण कराव्यात

पेस्ट

शहरी बाजारपेठेत कांदा पेस्टला मागणी वाढत आहे. पेस्ट तयार करण्यासाठी कापलेले कांदे तेलामध्ये तळून घेतले जातात. नंतर मिक्‍सरमधून काढून त्यांची पेस्ट केली जाते. कांदा पेस्ट केल्यामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते.

लोणचे

व्हिनेगर किंवा तेलाचा वापर करून कांद्याचे लोणचे तयार करता येते. अमेरिका आणि युरोप बाजारपेठेमध्ये व्हिनेगर वापरून आणि आशिया-आफ्रिका बाजारपेठेमध्ये तेल वापरून बनवलेले कांद्याचे लोणचे लोकप्रिय आहे.

तेल

कांद्यापासून तेलसुद्धा तयार करता येते. प्रक्रिया पदार्थांमध्ये कांद्याचा स्वाद आणण्यासाठी या तेलाचा वापर होतो. काही उत्पादनांमध्ये संरक्षक म्हणूनही त्याचा वापर केला जातो.

सॉस

कांद्यामध्ये साखर आणि इतर पोषक पदार्थ जास्त असतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रक्रिया करून व्हिनेगर असलेल्या सॉसची निर्मिती करता येते.

Onion Processing
Onion Processing Industry : कांदा पेस्ट निर्मितीसाठी लागणारी यंत्रे

प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर

आवरण काढण्याचे यंत्र

कांद्याचे बाहेरील आवरण काढण्यासाठी स्वयंचलित यंत्राचा वापर करता येतो. या यंत्राचा वापर करून प्रति तासाला ४० ते ५० किलो कांद्यावरील आवरण काढता येते.

मुळ्या कापण्याचे यंत्र

कांद्याचे शेंडे तसेच मुळ्या कापण्यासाठी यंत्र उपलब्ध आहे. प्रति ताशी या यंत्राची क्षमता १०० किलो आहे.

धुण्याचे यंत्र

या यंत्राचा वापर मुळ्या, शेंडे व बाहेरील आवरण काढलेला कांदा धुण्यासाठी केला जातो. या प्रक्रियेमुळे धूळ व अन्य खराब घटक कांद्यापासून वेगळे करता येतात. या यंत्रामुळे कांदा स्वच्छ होतो.

ग्राइंडर

ग्राइंडरच्या साह्याने ड्रायरमध्ये वाळविलेल्या कांद्याच्या चकत्यांची पावडर तयार करता येते. प्रति तासाला ५० किलो पावडर निर्मिती करण्याची या ग्राइंडरची क्षमता आहे. कांदा पावडर हवाबंद बाटली किंवा प्लॅस्टिक पिशवीमध्ये पॅक करता येतात.

चकत्या करण्यासाठी यंत्र

यंत्राद्वारे कांद्याच्या लहान लहान चकत्या केल्या जातात. या यंत्रामध्ये ०.४ मिमीपासून ०.८ मिमीपर्यंत चकत्या करता येतात. हे यंत्र स्वयंचलित आहे.

वाळविण्यासाठी ड्रायर

या यंत्रामध्ये चकत्या केलेला कांदा वाळवला जातो. कांद्यातील पाणी काढून टाकले जाते. या प्रक्रियेसाठी सोलर ड्रायर तसेच इलेट्रिक ड्रायरचा वापर करू शकतो.

ड्रायरमध्ये चकत्या केलेला कांदा १० ते १२ तास ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानामध्ये ठेवावा लागतो.

आरोग्यदायी फायदे 

लाल  कांदा

हा कांदा तिखट असतो. यामधील फ्लेव्होनॉईड घटक हृदयाच्या आरोग्यासाठी फार उत्तम मानला जातो. निद्रानाशाची समस्या देखील दूर होते.

उन्हाळ्याच्या दिवसात जेवण करताना कच्चा कांदा खाल्याने उष्माघाताची समस्या होत नाही.

पांढरा  कांदा

हा कांदा कच्चा सेवन करू शकतो, याचसोबत शिजवून देखील आहारात वापरता येतो.

पांढरा कांद्यात सल्फर आणि फ्लेवोनाइड अँटिऑक्सिडेंट असते. ज्यामुळे आपल्या शरीरातील कर्करोगाशी लढा देण्यासाठीची शक्ती वाढते.

कांद्यामध्ये क्वेरसेटिन आणि फाईसेटिन असते. यामुळे ट्यूमर वाढत नाही. कांद्यामध्ये क जीवनसत्त्व असते. तसेच फ्लेवोनाईड, तंतूमय घटक, फोलिक ॲसिड, प्रीबायोटिक्स, अँटिऑक्सिडेंट तसेच जिवाणूविरोधी घटक असतात. हे घटक आपल्या पोट, आतडे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

कांद्याच्या सेवनाने पचनासंबंधी कोणतीही समस्या तसेच विकार होत नाहीत.

ज्या व्यक्तींना साखरेची समस्या असेल अशा व्यक्तींनी पांढरा कांद्याचे सेवन करावे. आपल्या रक्तात असलेल्या साखरेचे प्रमाण नेहमी संतुलित रहाते. यामध्ये क्रोमिअम आणि सल्फर असते, ते रक्तामधील साखरेचे प्रमाण संतुलित राखण्याचे काम करत असतात.

ज्यांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी आहारात पांढरा कांद्याचे सेवन करावे.

पांढरा कांद्यामध्ये सेलिनिअम असते जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ करते.

पांढरा कांदा केसांसाठी लाभदायक असतो. पांढरा कांद्याचा रस जर केसांना लावला तर केस गळणे थांबते. केसांची वाढ होण्यास मदत मिळते.

पांढऱ्या कांद्याचे सेवन केल्याने दात दुखणे थांबते.

पांढरा कांदा वाटून टाचेवर चोळला तर पायाच्या भेगा ठीक होतात.

राजेश्वरी कातखडे, ८२०८९०१०८८ (अन्न तंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com