Solar Cabinet Dryer : घरगुती वापरासाठी सोलर कॅबिनेट ड्रायर

Solar Cabinet Dryer Use : सोलर कॅबिनेट ड्रायरच्या वापरासंबंधीतील माहिती या लेखातून पाहुयात.
Solar Cabinet Dryer
Solar Cabinet DryerAgrowon

अजय गव्हांदे

Domestic Use Solar Cabinet Dryer : बहुतांश शेतीमाल हा त्यातील आर्द्रतेच्या अधिक प्रमाणामुळे लवकर खराब होतो. हे खराब होणे टाळण्यासाठी त्यातील आर्द्रतेचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. दीर्घकाळ साठवणीसाठी तो पूर्ण वाळवून घ्यावा लागतो. ही साठवणीची पद्धती आपल्याला प्राचीन काळापासून माहिती आहे. मात्र पूर्वीपासून त्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर केला जातो.

शेतीमालावर सरळ सूर्यप्रकाश पडल्यामुळे पदार्थांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. अशा प्रकारे होणारा गुणवत्तेचा ऱ्हास रोखण्यासाठी सौरऊर्जेवर आधारित वाळवणी यंत्राचा वापर करता येतो. ही सौर वाळवणी यंत्र (सोलर ड्रायर) अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. एक्झॉस्ट फॅन असलेले कॅबिनेट ड्रायर घरगुती वापरासाठी किंवा लघु उद्योगाकरिता फायदेशीर ठरते.

Solar Cabinet Dryer
Solar Dryer : घरच्या घरी कसे बनवायचे सोलर ड्रायर

भारतामध्ये कृषिमालाचे काढणीनंतर नुकसान फार मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शेतीमालाच्या प्रक्रियेवर अधिक भर दिला जात आहे. पदार्थ जास्त काळ टिकून राहण्यासाठी अन्नपदार्थांचे निर्जलीकरण करणे आवश्यक असते. त्यासाठी पदार्थ वाळवले जातात. पारंपरिक पद्धतीत मोकळ्या जागेत सूर्यकिरणांच्या साहाय्याने पदार्थ वाळवतात.

वाळविण्याच्या  पारंपरिक प्रक्रियेमध्ये अनेक बाबी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात.  पदार्थाची गुणवत्ता ढासळते. पोषणतत्त्वे  कमी होतात. धूळ, पक्षी, चिमण्या, पाळीव प्राणी, किडे व उंदीर यांचा जास्त धोका उद्‍भवतो. सोलर कॅबिनेट ड्रायरच्या वापराचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पूर्णपणे सौरऊर्जेवर आधारित या सयंत्राची क्षमता ५ किलो एवढी आहे.

Solar Cabinet Dryer
Agriculture Technology : शेतीला होईल उपग्रहांची लक्षणीय मदत

सोलर कॅबिनेट ड्रायरची संरचना

एका वेळेस पदार्थ वाळविण्याची क्षमता - ५ किलो.आयताकृती आकाराचा ड्रायर चेंबर.

अधिक उष्णता शोषून घेण्यासाठी पृष्ठभागावर काळ्या रंगाचे आवरण.

आकारमान - ९६० × ५२० × ३०० मिमी.

यू. व्ही. स्टॅबिलायझेशन शीट

वायुविजनासाठी पंखा क्षमता - २ वॉट

सोलर पॅनेल - ५ वॉट

सोलर कॅबिनेट ड्रायरची वैशिष्ट्ये

सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कॅण्डी, बटाटा चिप्स, टोमॅटोचे काप, हिरवा भाजीपाला वाळविता येतो.

सोलर कॅबिनेट ड्रायरमध्ये दिवसा ‘ग्रीन हाउस इफेक्ट’मुळे आतील तापमानात वातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २० अंश सेल्सिअसने जास्त वाढ होते.

ड्रायरमधील तापमान ६० ते ६५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य/ भाजीपाला / फळे वाळविण्याकरिता करण्यात येतो.

ड्रायरमधील गरम हवा व सूर्याची किरणे या दोन्हींद्वारे पदार्थाची आर्द्रता लवकर कमी होते. पदार्थ सुकण्यास मदत होते.

ड्रायरमध्ये सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे आत शिरत नसल्यामुळे पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता टिकून राहते. 

पारंपरिक वाळवण पद्धतीपेक्षा कमी कालावधीत पदार्थ सुकतात आणि उच्च गुणवत्तेचे पदार्थ प्राप्त होतात.

यासाठी अजिबात वीज लागत नाही.

लघू उद्योगाकरिता याचा वापर करता येतो.

धूळ, पक्षी, चिमण्या, पाळीव प्राणी, किडे व उंदीर यांच्या त्रासापासून सुटका.

ड्रायरमध्ये वाळविलेल्या पदार्थाची चव, स्वाद रंग व गुणवत्ता तशीच टिकून राहते. गृहिणी, लघुउद्योजक तसेच महिला स्वयंसाह्यता समूहासाठी हे ड्रायर अत्यंत फायदेशीर आहे.

- अजय गव्हांदे, ९९२२६६८९४७

(सहायक प्राध्यापक, अपारंपरिक ऊर्जा अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद, जि. बुलडाणा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com