Onion Market
Onion MarketAgrowon

Onion Processing : महिला शेतकऱ्यांनी कांदा प्रक्रियेतून संधी निर्माण कराव्यात

Processing Industry : नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांनी नियमित कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहावे. यामध्ये महिला शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
Published on

Nashik News : नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांनी नियमित कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहावे. यामध्ये महिला शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यांनी कांद्यासारख्या पिकावर प्रक्रिया करून कांदा पावडर, पेस्ट, करप निर्मिती करावी. त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी सौर वाळवणसारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन धुळे लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताहाचे उद्‍घाटन नुकतेच डॉ. बच्छाव व कृषी विज्ञान केंद्राच्या अध्यक्षा मेघा बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. २३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

Onion Market
Onion Processing Industry : कांदा निर्जलीकरण प्रक्रिया उद्योगातील ‘सन्मित्र’

या सप्ताहानिमित्त कृषी विज्ञान केंद्रातर्फे रब्बी हंगाम पूर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन अजंग (ता. मालेगाव) येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी मेघा बोरसे होत्या. त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या वाटचालीबाबत माहिती दिली. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राचा फायदा घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे, सरपंच ज्ञानदेव पवार तसेच महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक केंद्राचे प्रमुख अमित पाटील यांनी केले.

Onion Market
Onion Processing Experiment : कांदा प्रक्रियेवर प्रयोग व्हावेत

डॉ. बच्छाव म्हणाल्या, की शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या साहाय्याने नवनवीन तंत्रज्ञान अवगत करावे. सुधारित वाणांची लागवड करण्यासह मधुमक्षिकापालन, रेशीम उत्पादन असे पूरक व्यवसाय, तर ड्रोन-तंत्रज्ञानाद्वारे फवारणी आदी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

उद्यानविद्या विषय विशेषज्ञ पवन चौधरी यांनी सुधारित रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञानासंबंधी माहिती दिली. डाळिंब संशोधन व तंत्रज्ञान प्रसार केंद्र प्रमुख डॉ. सचिन हिरे यांनी डाळिंबासाठी आवश्यक हवामान, जमिनीची निवड याबाबत मार्गदर्शन केले. विशाल चौधरी यांनी या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com