Agriculture Marketing Skill : शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्री कौशल्ये आत्मसात करण्याची गरज

Agriculture Technique : उत्पादकता वाढीसह उत्पादन खर्च कमी करणारे तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल.
Agriculture Marketing
Agriculture MarketingAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : उत्पादकता वाढीसह उत्पादन खर्च कमी करणारे तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल. यांत्रिकीकरणातून मजुरीवरील खर्च कमी करणे शक्य होईल. मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया तसेच निर्यातक्षम हळद, फळपिकांच्या उत्पादनावर भर द्यावा लागेल.

शेतकऱ्यांनी शेतीमाल पिकविण्यासोबतच बाजार चातुर्य, विक्रीची कौशल्ये आत्मसात करावी लागतील असा सूर मंगळवारी (ता. २९) कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे आयोजित मराठवाडा विभागस्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन कार्यशाळेतील शेतकरी चर्चासत्र उमटला.

चर्चासत्रात भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यांचे प्रांत संघटनमंत्री दादा लाड, वरपुड (ता. परभणी) येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत देशमुख, झरी (ता. परभणी) येथील कृषिभूषण सूर्यकांतराव देशमुख, कळमनुरी (जि. हिंगोली) येथील दत्तगुरू शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक गंगाधर शृंगारे, बारड (ता. मुदखेड, जि.नांदेड) येथील शीतलादेवी शेतकरी उत्पादक कंपनीचे नीलेश देशमुख, साताळा (ता. उदगीर, जि. लातूर) येथील तूर उत्पादक नंदकिशोर पाटील, वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्राचे तंत्रअधिकारी रमेश देशमुख सहभागी झाले होते. कृषी पर्यवेक्षक बलभीम आवटे सूत्रसंचालन केले.

Agriculture Marketing
Agriculture Commodity Market : मक्याच्या भावात घसरण सुरूच

दादा लाड म्हणाले, की कपाशीच्या उत्पादकता वाढीसाठी सघन पघ्दतीने लागवड, गळफांद्या काढून टाकणे, शेंडा खुंडणे या तंत्रज्ञानाचा अंगीकार गरजेचा आहे. चंद्रकांत देशमुख म्हणाले, की फळबागेतून शाश्‍वत उत्पन्न मिळू शकते.कमी कालावधीत येणाऱ्या आंब्याच्या वाणांची करावी.

Agriculture Marketing
Agriculture Market Rate: खुल्या बाजारातही शेतकऱ्यांच्या तूर, हरभऱ्याला चढे दर मिळेना

सूर्यकांतराव देशमुख म्हणाले, की पारंपरिक पिकांपेक्षा फळशेती फायदेशीर ठरते. यांत्रिकीकरणामुळे मजुरीवरील खर्च वाचतो. शृंगारे म्हणाले, की समविचारी मित्रांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे शेतीमालासाठी विपणन व्यवस्था उभी केली त्यातून २५ हजारांवर शेतकरी जोडले गेले. हळद प्रक्रिया तसेच निर्यात केली जात आहे.

रमेश देशमुख म्हणाले, की हळद संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर कमी अधिक कालवधीत येणाऱ्या विविध वाणांची प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. नीलेश देशमुख म्हणाले, की केळी निर्यातीसाठी आखाती देशांसह ८ ते १० देशांत संधी आहेत. पाटील म्हणाले, की गादी वाफा पद्धतीने ठिबक सिंचनावर लागवड केल्यास तुरीची उत्पादकता अधिक मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com