Agriculture Market Rate: खुल्या बाजारातही शेतकऱ्यांच्या तूर, हरभऱ्याला चढे दर मिळेना

Market Update: तूर व हरभऱ्याची शासकीय खरेदी करण्याचे धोरण राज्य सरकारने लागू केले असले तरी या खरेदीत अनेक अडचणी आहेत. त्यामुळे आर्थिक निकडीपायी शेतकरी खुल्या बाजाराकडे वळले आहेत.
Tur and Chana
Tur and ChanaAgrowon
Published on
Updated on

Amravati News: तूर व हरभऱ्याची शासकीय खरेदी करण्याचे धोरण राज्य सरकारने लागू केले असले तरी या खरेदीत अनेक अडचणी आहेत. त्यामुळे आर्थिक निकडीपायी शेतकरी खुल्या बाजाराकडे वळले आहेत. शेतकऱ्यांच्या याच आर्थिक अगतिकतेचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी दोन्ही शेतीमालांचे भाव हमीदरापेक्षा कमी केले. तुरीला हमीदरापेक्षा सरासरी ४८७ तर हरभऱ्याला २२५ रुपये कमी दर मिळत आहे.

खासगी बाजारात शेतीमालाचे दर कोसळले असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने नाफेडच्या माध्यमातून हमीदराने सोयाबीन, तूर व हरभऱ्याची शासकीय खरेदी प्रारंभ केली. सोयाबीनचे उद्दीष्टही पूर्ण झाले नसताना खरेदी गुंडाळण्यात आली, तर तूर व हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात आली आहे. तुरीच्या नोंदणीस ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढही देण्यात आली. तर हरभरा नोंदणीत तांत्रिक अडचणी आल्या आहेत.

Tur and Chana
Tur Procurement : तूर खरेदीचा साडेपाच लाख क्विंटलचा टप्पा पार

त्यामुळे खरेदी होऊ शकलेली नाही. दोन्ही शेतीमालांच्या शासकीय खरेदी रखडल्या आहेत. खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारेही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. नाफेडच्या या कार्यपद्धतीला कंटाळून शेतकऱ्यांनी खासगी बाजाराकडे वळले आहेत. अमरावती बाजार समितीत शनिवारी (ता. २६) तुरीला ६,९०० ते ७,२२७ रुपये प्रति क्विंटल दर खरेदीदारांनी उघडला. सरासरी ७,०६३ रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला.

Tur and Chana
Chana Rate: बाजारभाव वाढल्याने सरकारही वाढलेल्या दरात हरभरा खरेदी करण्याची शक्यता

हमीदराच्या तुलनेत हा दर ४८७ रुपयांनी कमी आहे. शनिवारी २,३५८ पोत्यांची आवक झाली. हरभऱ्याच्या दरातही घट दिसून आली. सरकारने हरभऱ्यास ५,६५० रुपये प्रति क्विंटल दर दिला आहे. शासकीय केंद्रांवर याच दराने खरेदी करण्यात येणार असली तरी नोंदणी व खरेदी, या दोन्ही प्रक्रिया रखडल्या आहेत. शनिवारी हरभऱ्याच्या १,३०७ पोत्यांची आवक झाली. खरेदीदारांनी ५,३५० व ५,५०० रुपये दर लिलावात उघडला. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सरासरी ५,४२५ रुपये दर मिळाला. हमीदराच्या तुलनेत तो २२५ रुपयांनी कमी आहे.

शेतीमाल हमीदर खासगी बाजारातील दर तफावत

तूर ७,५५० ७,०६३ ४८७

हरभरा ५,६५० ५,४२४ २२५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com