Rural Educational Story: मी नव्हे आम्ही : कुंदा बच्छाव

Kunda Bacchav: कुंदा बच्छाव या आनंदवली शाळेतील शिक्षिका केवळ अध्यापनात नव्हे तर समाजपरिवर्तनातही महत्त्वाचे योगदान देत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली 'मी नव्हे आम्ही' या तत्त्वावर आधारित उपक्रम शाळेच्या यशस्वी वाटचालीला नवे दिशा देत आहेत.
Teacher Kunda Bacchav
Teacher Kunda BacchavAgrowon
Published on
Updated on

डॉ. कैलास दौंड

A New Initiative of School: नवनवे उपक्रम राबविण्याबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करणारी म्हणून आनंदवली शाळेची ओळख आहे. शालेय उपक्रमांच्या आखणी आणि अंमलबजावणी मध्ये येथील शिक्षिका कुंदा बच्छाव यांचा नेहमीच पुढाकार असतो. शाळेतील सर्व शिक्षक ‘मी नव्हे आम्ही’ अशा सहकार्याच्या भावनेने काम करतात.

नाशिक मनपाची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यामंदिर महानगरपालिका शाळा क्रमांक १८ आनंदवली ही त्या परिसरातील सर्वांत मोठी शाळा, जिचा पट जवळपास आठशे आहे. कष्टकरी व सर्वसामान्य आर्थिक स्तरातील पालकांची मुले या शाळेत येतात. विशेष म्हणजे या शाळेने त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आत्तापर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन पाहण्यासाठी मुंबई व बेंगलोर येथील इस्रोला भेट देण्यासाठी दोन सहली पूर्णपणे लोकसहभागातून काढलेल्या आहेत.

आत्तापर्यंत १८ विद्यार्थी ‘एनएमएमएस’ परीक्षेत तर आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले आहेत. शिक्षिका कुंदा बच्छाव यांच्या स्टेम क्लब उपक्रमास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अंतर्गत एक लाख रुपयांची शरद पवार फेलोशिपही प्राप्त झाली. तसेच या उपक्रमाची ‘SCERT’ने (स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग) दखल घेत नवोपक्रमांसाठीचे बक्षीस ही प्राप्त झाले.

Teacher Kunda Bacchav
Rural Story: मातीशी एकरूप झालेलं गाव...

आमच्या आवडीच्या कवितेचा तास या मधून विद्यार्थ्यांना लेखनासाठी प्रेरणा दिली जाते. विद्यार्थ्यांच्या कविता वेगवेगळ्या मासिकांमध्ये छापून आल्यात. त्यांच्या १०० कवितांचे संपादन करून ‘कविता उमलत्या कळ्यांच्या’ नावाचे पुस्तकही कुंदा बच्छाव यांनी पुढाकार घेऊन प्रकाशित केले आहे.

आनंदवली शाळेचे उपक्रम

या माध्यमातून कला, कौशल्याचा आणि गुणवत्ता विकास साधण्यासाठी प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना मुंबई येथील राष्ट्रीय क्यूब स्पर्धा, गायन स्पर्धा, अबॅकस स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील बक्षीसेही विद्यार्थ्यांना प्राप्त झालीत. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे पोर्टफोलिओ तयार केलेले आहेत. शाळेला सुमारे २५ लाखांचा लोकसहभाग प्राप्त झाला असून त्यात स्मार्ट टीव्ही, मोबाईल, सायकली, शैक्षणिक साहित्य, स्पोर्ट्स ड्रेस, स्टेम क्लब साठी आवश्यक गिटार, कॅसिओ, माइक सिस्टीम, अवांतर वाचनाची पुस्तके, बूट व खाऊ अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. यासाठी बच्छाव मॅडमसह सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला आहे.

समाजाच्या सहभागाने शाळेतील गरजू विद्यार्थिनींना आर्थिक सहकार्य करणे व उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, याकरिता ‘शैक्षणिक पालकत्व’ व ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम कुंदा बच्छाव मॅडम यांनी सुरू करून समाज सहभागातून आजवर त्याकरिता दहा लाख रुपये जमा केले. त्यातून नाशिक व नाशिक बाहेरील १३० विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी दत्तक घेतले असून यातील काही विद्यार्थिनी सी.ए., इंजिनिअरिंग, बी.कॉम., एमपीएससी, बी.ए. आयटीआय यासारखे शिक्षण घेत आहेत.

Teacher Kunda Bacchav
Rural Education : औपचारिक शिक्षणाची पीछेहाट

त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण देखील कमी झाले. या कार्यामुळे बच्छाव त्यांना आनंदवलीची सावित्री म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांना सामाजिक समस्यांची जाणीव व्हावी व त्यांच्या निराकरणासाठी त्यांनी पुढे यावे म्हणून बच्छाव यांनी शाळा व मनपा स्तरावर ‘वसुधैव कुटुंबकम’, साक्षरतेकडून समृद्धीकडे, प्लॅस्टिक हटाव-देश बचाव, मेरी बेटी-मेरा अभिमान, श्रेष्ठ दान-इंद्रिय दान, तंबाखूमुक्त, व्यसनमुक्त - माझी शाळा माझे गाव यासारखे उपक्रम राबवत विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये जागरूकता निर्माण केली.

कुंदा बच्छाव यांनी आपल्या शाळेत ‘आनंदवली शिक्षण कट्टा’ आणि ‘अधिकारी आपल्या भेटीला’ हे उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी माहिती देण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यात आजवर पस्तीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत येऊन मार्गदर्शन केले आहे.

आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील माहिती व्हावी यासाठी त्यांनी e twining school हा उपक्रम राबवत अमेरिका खंडातील ग्वातेमाला देशाबरोबर वर्षभर जागतिक समस्यांवर चर्चा व उपाय, कल्चरल एक्सचेंज हे सत्र आयोजित केलेत. तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी श्रीमती बच्छाव यांनी विद्यार्थ्यांना स्पॅनिश आणि जर्मन शिकविले. विद्यार्थ्यांनी तिथल्या शिक्षकांशी स्पॅनिश भाषेत संवाद साधला.

श्रीमती बच्छाव यांनी SCERT व NCERT या शैक्षणिक संस्थांमध्ये योगदान दिले आहे. त्यांना नाशिक महानगरपालिका व महाराष्ट्र शासन यांचे शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. NCERT, दिल्ली आयोजित ऑल इंडिया नॅशनल चिल्ड्रन्स कंटेंट कॉम्पिटिशन २०२४-२५ मध्ये बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या एका विद्यार्थ्याने बनविलेल्या व्हिडिओची निवड झाली असून महाराष्ट्रातून तो एकमेव सरकारी व तोही मनपा शाळेतील विद्यार्थी निवडला गेला आहे.

कुंदा बच्छाव ९४२०६९५०६५

(लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com