Water Scarcity : नवीन जलकुंभ देखाव्यापुरता

Water Supply : शिक्षक कॉलनी व अनिकेत सैनिक स्कूल परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी चार वर्षांपूर्वी नवीन जलकुंभासह नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात आले.
Jal Jivan Mission
Jal Jivan MissionAgrowon

Buldana News : पुरेसे पाणी उपलब्ध असूनही गावकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी प्रशासन उदासीन असल्याने फटका बसतो आहे. शिक्षक कॉलनी व अनिकेत सैनिक स्कूल परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी चार वर्षांपूर्वी नवीन जलकुंभासह नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात आले.

तो जलकुंभ देखाव्यापुरता असून त्यातून पाणी सोडण्याबाबत येथील ग्रामपंचायत प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना पैसे खर्च करून कॅन व टॅंकरने आपली तहान भागवावी लागत आहे.

Jal Jivan Mission
Water Scarcity : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४१२ गावांना ६७८ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा

कोराडी धरणावरून केलेली नळपाणी पुरवठा योजना दुरुस्त करून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच सुमारे ३.५० कोटी रुपयांचा निधी आ. डॉ. शिंगणे यांनी देऊनही या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून नुसतीच पाइपलाइन शोधण्याच्या नावाखाली खड्डेच खोदणे सुरू आहे.

Jal Jivan Mission
Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

हे खड्डे पाणी पुरविण्याऐवजी अपघातास निमंत्रण देत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या येथील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. प्रशासन मात्र या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्याबाबत सुस्त आहे.

तीन जलकुंभ तरीही पाणीटंचाई

पाणी साठविण्यासाठी येथील किल्ल्यावर ४ लाख लिटर क्षमतेचा , पलसिध्द मठाजवळ ३.५० लाख लिटर क्षमतेचा एक व शेंदूर्जन रोडवरील पंपाजवळ ३ लाख लिटर क्षमतेचा तिसरा असे तीन जलकुंभ उभे राहिले आहेत. शिक्षक कॉलनीतील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी ४ वर्षांपूर्वीच शेंदूर्जन रोडवरील हा तिसरा विशेष जलकुंभ बांधण्यात आला आहे. पण सदोष वितरण प्रणालीमुळे या तिसऱ्या जलकुंभापर्यंत पाणी पोहोचत नसल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com