Water Scarcity : पाण्याअभावी १६ धरणे कोरडी

Water Crisis : : वाढत्या उष्णतेमुळे पुणे जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत आटले असून, अनेक तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत.
Water Scarcity
Water Scarcity Agrowon

Pune News : वाढत्या उष्णतेमुळे पुणे जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत आटले असून, अनेक तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. याशिवाय १६ धरणे कोरडी पडली पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी टॅँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याने टँकरच्या मागणीत वाढ होताना दिसून येत आहे.

मागील दोन महिन्यांपासून उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने धरणांतील पाण्याची मागणी वेगाने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला असून मे महिन्याच्या मध्यावर जवळपास निम्म्याहून अधिक धरणे कोरडी पडली आहेत. सध्या धरणांत अवघा १० टक्के म्हणजेच २०.८३ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे एक ते दीड महिने पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता आहे.

Water Scarcity
Water Scarcity : मराठवाड्यात १४४ लघू, मध्यम प्रकल्प कोरडे

धरणातील पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. पुणे जिल्ह्यात लहान-मोठी एकूण २६ धरणे आहेत. या धरणांतील पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना होतो. गेल्या महिन्यापासून अति उष्णतेमुळे धरणातील पाण्याची मागणी होती. त्यामुळे धरणातील पाण्याची पाणीपातळी झपाट्याने कमी झाली आहे.

गेल्या वर्षी याच काळात या धरणांत एकूण ३६.८९ टीएमसी म्हणजेच १८ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पाणीसाठ्यात जवळपास आठ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येते. तर, टेमघर, कासारसाई, वडिवळे, शेटफळ, नाझरे, चिल्हेवाडी, माणिकडोह, येडगाव, विसापूर, उजनी, वडज ही धरणे कोरडी पडली असून, यामध्ये मृत पाणीसाठा उपलब्ध आहे. तर नाझरे धरणांत मृतसाठाही संपुष्टात आला आहे.

Water Scarcity
Pune water scarcity : पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट! धरणांमध्ये फक्त २३ टक्केच पाणीसाठा

उन्हाळी हंगामामुळे शेतकऱ्याकडून मागणी वाढली आहे. यामुळे खडकवासला, चासकमान, वीर, पिंपळगाव जोगे, डिंभे या धरणांतून डाव्या आणि उजव्या अशा कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे.

सध्या मुठा खोऱ्यातील चार धरणांत अवघा ६.६५ टीएमसी म्हणजेच २२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये ५.२१ टीएमसी म्हणजेच १० टक्के पाणीसाठा आहे. कुकडी खोऱ्यातील धरणांमध्ये २.३६ टीएमसी म्हणजेच ६ टक्के पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com