
Beed News : आगामी खरीप हंगामाकरिता खते, बियाणे व आवश्यक निविष्ठा यांचे मॉन्सून आगमनाच्या पूर्वीच तालुकानिहाय पुरवठा नियोजन तसेच त्यांच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख यांनी दिले.
खरीप हंगाम २०२५ ची पूर्वतयारी व नियोजनाकरिता जिल्ह्यांतर्गत कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची एकदिवसीय कार्यशाळा बुधवारी (ता. १६) बीड येथे झाली. त्या वेळी श्री. देशमुख बोलत होते.
कार्यशाळेस विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी माधुरी सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. साळवे, पल्लवी जगताप, कृषी उपसंचालक डी. व्ही. जाधवर, कृषी विकास अधिकारी एस. एस. सय्यद तसेच सर्व उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते.
या वेळी येणाऱ्या आगामी खरीप हंगाम-२०२५ ची पूर्वतयारी व नियोजन याबाबत क्षेत्रिय स्तरावर करावयाच्या विविध मोहिमा यामध्ये माती परीक्षण मोहीम, घरगुती बियाणे उगवणक्षमता चाचणी मोहीम, बीजप्रक्रिया मोहीम, हुमणी कीड नियंत्रण मोहीम,खरीप पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी गावनिहाय प्रशिक्षण मोहीम, कृषी निविष्ठांच्या वाजवी वापराबाबत जनजागृती मोहीम, आपत्कालीन पीक नियोजन, कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रे आदीकरिता दिलेल्या विहित वेळापत्रकानुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत विभागीय कृषी सहसंचालक श्री. देशमुख, यांनी सविस्तर व सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेस जिल्ह्यातील कृषी विभागाचे सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, कार्यालयीन कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच सर्व तंत्र अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उलेलखनिय कार्य केलेल्या विविध शेतकरी गटांचा तसेच अधिकारी व कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. साळवे यांनी तर आभार कृषी उपसंचालक डी. व्ही. जाधवर यांनी मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.