Historical Tourism: ऐतिहासिक स्थळांच्या पर्यटनाचा लाभ घ्यावा

Indian Railway Announcement: भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या विशेष रेल्वेची घोषणा केली आहे.
Railway Department
Railway DepartmentAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे.

ही यात्रा ‘भारत गौरव टूरिस्ट ट्रेन’अंतर्गत ९ जून २०२५ पासून सुरू होत आहे. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. श्री. पापळकर यांनी सोमवारी (ता. २) दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हानिहाय आढावा घेतला.

Railway Department
Maharashtra Cabinet Decision: राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापनेस मान्यता

या वेळी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रेल्वे विभागाचे अधिकारी गुरूराज सोना यांच्यासह बैठकस्थळी अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, नगरविकास विभागाचे देविदास टेकाळे उपस्थित होते.

Railway Department
Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

विभागीय आयुक्त श्री. पापळकर म्हणाले, की भारत गौरव टूरिस्ट ट्रेनच्या या पाच दिवसांच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारित कार्यक्रम असणार आहेत. भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून या यात्रेदरम्यान गडकोटांवर, ऐतिहासिक स्थळी पर्यटकांना आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत.

भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी चांगली तयारी केली आहे. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

यात्रेदरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी आयआरटीसीटीच्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. पाच दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल. प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com