Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Bullet Train Line Work : बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या व्हायाडक्टवर रेल्वे रूळ टाकण्याच्या कामासह जोडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
Bullet Train
Bullet TrainAgrowon
Published on
Updated on

Manor News : बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या व्हायाडक्टवर रेल्वे रूळ टाकण्याच्या कामासह जोडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गुजरात राज्यातील सुरत आणि आनंद येथे ट्रॅक कन्स्ट्रक्शन बेस (टीसीबी) स्थापन करण्यात आले आहेत.

रेल्वेचे रूळ फ्लॅश बट वेल्डिंगने जोडण्यात येत असून व्हायाडक्टवर दोनशे मीटर लांबीचे पॅनेल बनवण्यास सुरुवात झाली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सुरत आणि वडोदरा येथे ३५ हजार मेट्रिक टनपेक्षा अधिक वजनाच्या रेल्वे रूळ जोडणाऱ्या यंत्रांचे चार संच उपलब्ध झाले आहेत.

Bullet Train
पशुपैदास केंद्राची जागा बुलेट ट्रेनसाठी

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानी शिंकानसेन ट्रॅक प्रणालीवर आधारित खडीविरहित काँक्रीट स्लॅब ट्रॅक प्रणालीचा वापर केला जाणार आहे. भारतात पहिल्यांदा खडीविरहित स्लॅब ट्रॅक सिस्टिमचा वापर केला जात आहे.

मशिन्समध्ये रेल्वे फीडर कार, ट्रॅक स्लॅब लेइंग कार, कॅम लेइंग कार आणि फ्लॅश बट वेल्डिंग मशीन यांचा समावेश आहे. ज्याचा वापर ट्रॅकच्या बांधकाम आणि रूळ जोडणीसाठी केला जाईल.

Bullet Train
Bullet Train : राज्य सरकारचे बुलेट ट्रेनच्या गतीने काम सुरू ः बावनकुळे

रेल फिडर कार

दोनशे मीटर लांबीचे ट्रॅक रेल्वे फीडर कार आणि विशेष वॅगन वापरून आरसीसी बेडवर टाकले जातात. आरएफसी रेल्वे ट्रॅक (जोडी) आरसी बेडवर ढकलते आणि तात्पुरता ट्रॅक सुरुवातीला आरसी ट्रॅक बेडवर टाकला जातो. आतापर्यंत चार आरएफसी मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. यामुळे आता बुलेट ट्रेनच्या कामाला गती येणार आहे.

ट्रॅक स्लॅब लेइंग कार

प्रीकास्ट ट्रॅक स्लॅब व्हायाडक्टवर उचलले जातात, खास डिझाइन केलेल्या वॅगन्सवर लोड केले जातात आणि ट्रॅक ठेवण्याच्या ठिकाणी नेले जातात. टीएसएलसी मशीन एकावेळी पाच स्लॅब हाताळू शकते, ट्रॅक स्लॅब आरसी ट्रॅक बेडवर स्थितीत ठेवतात. व्हायाडक्टवर स्लॅबच्या कामासाठी टीएसएलसी मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com