Residue Free Grape : द्राक्षाविषयी अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करा

Grape Export : भारतीय फलोत्पादन क्षेत्रात प्रामुख्याने द्राक्ष उद्योगाने युरोपासह जागतिक बाजारपेठ काबीज करून देशाची मान उंचावली. ‘रेसिड्यू फ्री’ द्राक्षमालास जगभरात मागणी आहे.
Grape Export
Grape ExportAgrowon

Nashik News : भारतीय फलोत्पादन क्षेत्रात प्रामुख्याने द्राक्ष उद्योगाने युरोपासह जागतिक बाजारपेठ काबीज करून देशाची मान उंचावली. ‘रेसिड्यू फ्री’ द्राक्षमालास जगभरात मागणी आहे. मात्र असे असताना द्राक्षांच्या गुणवत्तेबाबत तथ्यहीन मुद्दे व अफवा व्हिडिओच्या माध्यमातून समाज माध्यमावर पसरविल्या जात आहेत.

त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन द्राक्ष उद्योगाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक व व्यापारी संतप्त झाले असून थेट पोलिस ठाण्यात धडक दिली आहे. अफवा पसरवणाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राकडून मिळणाऱ्या शास्त्रीय माहितीच्या आधारे शिफारशीनुसार रसायनांचा वापर करून द्राक्ष उत्पादन घेतले जात आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर द्राक्षाविषयी अर्धवट व तथ्यहीन माहिती व्हिडिओद्वारे प्रसारित केली जात आहे. त्याविरोधात तरुण द्राक्ष उत्पादक व संलग्न घटकांनी एकत्र येत याबाबत एक चळवळ सुरू केली आहे.

Grape Export
Grape Season : यंदाचा द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात

वडनेरभैरव (ता. चांदवड) येथील शेतकऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, समाज माध्यमांवर फिरणारे व्हिडिओ हे बेदाणा उत्पादन संबंधित आहे. यामध्ये कुठल्या प्रकारचे हानिकारक रसायन वापरले जात नाही. असे असताना चुकीच्या बातम्या आणि व्हिडिओ प्रसारित केल्या जात आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

‘ग्रेप्स सोशल मीडिया वॉरियर्स’ मैदानात

द्राक्षविषयक अर्धवट माहितीचे संप्रेषण, अफवा व गैरप्रचार थांबवण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी ‘ग्रेप सोशल मीडिया वॉरियर्स’ नावाने चळवळ उभारली आहे. चुकीची माहिती व मजकूर पसरविणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईची तयारी सुरू केली आहे.

Grape Export
Grape Export : भातपट्ट्यातून रंगीत द्राक्षांची निर्यात

शेतकऱ्यांनी आता संघटितपणे पोलिस प्रशासनाकडे धाव घेत अशा व्हिडिओचा शोध घेऊन ते फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या समाज माध्यमातून हटवण्याची मागणी केली आहे. यासह काही तरुण शेतकऱ्यांनी थेट अशा व्हिडिओच्या पेज व ग्रुप ॲडमिन यांच्याशी संपर्क साधत त्यांना समज देत मजकूर व व्हिडिओ काढण्याचे आवाहन केले आहे.

द्राक्ष उत्पादनात अनेक निकष पाळले जातात. उत्पादन हाती आल्यानंतर काढणीपूर्व अनेक चाचण्या करून त्याचे अहवाल तपासूनच द्राक्ष निर्यात होते किंवा बाजारात जातो. मात्र असे असताना द्राक्ष उद्योगावर परिणाम होईल असा मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्याची गरज आहे.
- किशोर मोहिते, द्राक्ष उत्पादक व तक्रारदार, वडनेर भैरव, ता. चांदवड
गेल्या ४० वर्षांपासून द्राक्ष व्यापार क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र द्राक्ष खाऊन कोणाला अपाय झाला, अशी आतापर्यंत कुठलीही तक्रार आलेली नाही. ग्राहकांनी खात्रीशीर माहितीवर विश्वास ठेवावा, अफवांवर विश्वास ठेवू नये. ज्याने चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवले आहेत त्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
- मोहंमद फारुख, द्राक्ष व्यापारी, अमरोहा (उत्तर प्रदेश)
द्राक्ष उत्पादक काटेकोरपणे कामकाज करून उत्पादन घेतात. मात्र असे असताना खोडसाळपणे द्राक्ष उद्योग अडचणीत येईल अशी कृत्य करणारे घटकांविरोधात सायबर सेलकडे तक्रार नोंदविण्यात येत आहे. या मुद्द्यावर नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे कारवाई करण्यासंदर्भात मागणी द्राक्ष बागायतदार संघ करणार आहे.
- कैलास भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com