Loksabha Election : लोकसभेसाठी सतर्क राहावे

Amit Shah : सर्व समाजघटक जोडून अधिकाधिक मतदान कसे होईल, यासाठी प्रयत्न करावेत,’’ असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मंगळवारी (ता. ५) दिला.
Amit Shah
Amit ShahAgrowon
Published on
Updated on

Akola News : ‘‘नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आगामी ४० दिवस आपल्याला मिळालेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. सतर्क राहावे. सर्व समाजघटक जोडून अधिकाधिक मतदान कसे होईल, यासाठी प्रयत्न करावेत,’’ असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मंगळवारी (ता. ५) दिला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मंगळवारी श्री. शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला, वाशीम, बुलडाणा , अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आदी लोकसभा मतदारसंघातील भाजप संचालन समिती व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते.

Amit Shah
Disaster Management : आपत्ती व्यवस्थापनातून मिळणार १०० कोटी रुपये

श्री. शाह म्हणाले, ‘‘शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी तसेच समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्याचे काम करा. काँग्रेसने आजवर तुष्टीकरणाचे राजकारण केले. परंतु पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात नवीन समाजकारण, राजकारण व समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम होत आहे.’’

Amit Shah
SGU Icon Award : चितळे डेअरीचे गिरीश चितळे यांना ‘एसजीयू आयकॉन २०२४’ पुरस्कार

श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यात किमान ४५ जागांवर विजय मिळवू. विदर्भातील दहाही जागा जिंकू.’’

बॅनर फाडल्याने गालबोट

भाजपतर्फे अकोला शहरात विमानतळ ते कार्यक्रमस्थळापर्यंत अमित शाह यांच्या स्वागताचे पोस्टर्स लावले होते. दरम्यान कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बॅनर अज्ञाताने फाडला. याचा पोलिस तपास करीत आहेत. दौऱ्यानिमित्त पोलिसांनी कडक बंदोबस्‍त ठेवला. आंदोलन होण्याची शक्यता पाहता काही जणांना स्थानबद्धही करून ठेवण्यात आले. कार्यक्रमस्थळापासून काही अंतरावर असलेल्या रिधोरा गावात नागरिकांना प्रवेश करण्यासाठी बंदोबस्ताचा मोठा त्रास सहन करावा लागला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com