Mango Season : विक्रमगडमध्ये हापूस, केसर आंब्याची आवक वाढली

Kesar Mango : सध्या चविष्ट, स्वस्त, आंबे दाखल होत असल्याने रोजच्या जेवणात या आंब्यावर सर्वच जण ताव मारत आहेत. पाऊस पडण्यापूर्वी सर्व आंबे विकले जावे, यासाठी बागायतदारांची धडपड आहे.
Fruit Market
Fruit MarketAgrowon
Published on
Updated on

Palghar News : येथील प्रसिद्ध गावठी गोड हापूस-केसर आंबा बाजारात दाखल होत असून या वर्षी १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री होत आहे. गेल्या वर्षी याच आंब्याचे भाव ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत होती.

सध्या आंब्याचा सिझन असल्याने गावठी गोड आंब्याना प्रचंड मागणी आहे. बऱ्याच महिला टोपल्या घेऊन घरोघरी फिरून आंब्याची विक्री करीत आहेत. या विक्रीमधून रोजगार मिळत आहे.

Fruit Market
Mango Pickle Market: घरगुती लोणच्याची तयार केली बाजारपेठ

सध्या चविष्ट, स्वस्त, आंबे दाखल होत असल्याने रोजच्या जेवणात या आंब्यावर सर्वच जण ताव मारत आहेत. पाऊस पडण्यापूर्वी सर्व आंबे विकले जावे, यासाठी बागायतदारांची धडपड आहे.

Fruit Market
Sindoor Mango: ‘वरपुड सिलेक्शन-१’ आंब्याचे नामकरण ‘सिंदूर’

यंदा वादळी, अवकाळी पावसाने आंबा बागायतदाराचे प्रचंड नुकसान झाल्याने बाजारात आवक कमी झाली आहे. मागणी अधिक असल्याने आंब्याचे भाव वाढले आहेत. यंदा आंबा उशिरा बाजारात दाखल झाल्याने त्याचे भावही वाढल्याचे बागायतदार विजय सांबरे याचे म्हणणे आहे.

विक्रमगडमधील कसदार मातीत हापूस, केसर, लंगडा, पायरी आंबा उत्तम होत आहे. पावसामुळे आंबा मोहर करपला. सरकारने दखल घेऊन पंचनामेही केले आहेत. मात्र. अद्याप सरकारची मदत शेतकऱ्यांपर्यत पोहचली नाही. आंबा उत्पादक शेतकरी सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com