Crop Development Council : मका, मिलेट्स पीक विकास परिषदेच्या अध्यक्षपदी सूर्यकांत सांडसे

Chairman of Crop Development Council : पीक परिषदेच्या अध्यक्षपदी धाराशिव येथील सूर्यकांत सांडसे यांची निवड करण्यात आली, अशी माहिती ‘स्मार्ट’च्या सूत्रांनी दिली.
Crop Development Council
Crop Development CouncilAgrowon

Pune News : राज्यात जागतिक बँक अर्थसाहाय्यित स्मार्ट प्रकल्पांच्या प्रकल्प अंमलबजावणी कक्षाच्या माध्यमातून ग्राम सामाजिक प्ररिवर्तन प्रतिष्ठानद्वारे निवडक पिकांच्या ‘पीक विकास परिषद’ स्थापन करण्यात आली आहे. या वेळी पीक परिषदेच्या अध्यक्षपदी धाराशिव येथील सूर्यकांत सांडसे यांची निवड करण्यात आली, अशी माहिती ‘स्मार्ट’च्या सूत्रांनी दिली.

पीक विकास मूल्य साखळीतील सर्व भागधारकांना एका समान व्यासपीठावर आणून त्यांच्यातील समन्वयाद्वारे बाजारातील स्पर्धात्मकता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘मका आणि मिलेट्स विकास परिषदे’ची स्थापना ‘इंडो - मेझ ॲण्ड मिलेट्स डेव्हलपमेंट असोसिएशन’ या नावाने १२ जून २०२४ रोजी कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत ना-नफा कंपनी म्हणून नोंदविण्यात आली आहे.

Crop Development Council
Agriculture Sowing : बीडमध्ये ७८ टक्के पेरणी आटोपली

स्मार्ट प्रकल्पांतर्गत द्राक्षे आणि सोयाबीन परिषदेच्या नोंदणीत्तर महाराष्ट्रातील ही तिसरी पीक विकास परिषद असून, तृणधान्य व भरडधान्य पिकातील ही पहिली पीक विकास परिषद म्हणून ओळखण्यात येणार आहे. मका-मिलेट्स उत्पादन, मूल्यवर्धन प्रक्रिया, विपणनासाठी या परिषदेचे योगदान महत्त्वपूर्ण असणार आहे. परिषदेची बैठक पुणे येथील मुख्य कार्यालयात सर्व संचालकांच्या उपस्थित नुकतीच पार पडली.

Crop Development Council
Disposal of Pesticides : मुदतबाह्य कीटकनाशकांच्या विल्हेवाटीचा अद्याप तिढा

या मका, मिलेट्स विकास परिषद स्थापन करण्याकरिता स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, व्हीएसटीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजाराम दिघे, अतिरिक्त प्रकल्प संचालक ज्ञानेश्वर बोटे, अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, नोडल अधिकारी चंद्रकांत माळी, अविनाश भोसले, जयप्रकाश शिंपी, संदीप पाटील आदी उपस्थित होते. या वेळी आरती महाजन यांनी प्रास्ताविक केले. तर सुशांत पवार यांनी आभार मानले.

...अशी आहे पीक परिषद

सूर्यकांत सांडसे-धाराशिव (अध्यक्ष), आशिष नाफाडे-बुलडाणा (उपाध्यक्ष), महेश लोंढे पुणे (सचिव), संचालक गंगाधर चिंधे-अहमदनगर, अनिल शिंदे-सिन्नर, कारभारी मनगटे-संभाजीनगर, पुरुषोत्तम लगड- अहमदनगर, प्रशांत लोखंडे- अहमदनगर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com