PM Surya Ghar Yojana : पंतप्रधान सूर्य घर योजनेचे सर्वेक्षण सुरू

PM Surya Ghar Yojana Survey : भारताला सौर ऊर्जेमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना जाहीर केली आहे.
PM Surya Ghar Yojana
PM Surya Ghar YojanaAgrowon
Published on
Updated on

Nanded News : भारताला सौर ऊर्जेमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी पोस्ट विभागाला देण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या ता. २७ फेब्रुवारीपासून सुरूवात करण्यात आली आहे. आत्तापर्यंत साडेसात हजार घराचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

पंतप्रधान सूर्य घर योजनेतून देशातील एक कोटी कुटुंबांना महिन्याला तीनशे युनीटपर्यंत मोफत वीज पुरविण्याचा शासनाचा उद्देश आहे. या योजनेद्वारे एक कोटी घरांना सवलतीच्या दरात सौर पॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी गावागावात पोस्ट विभागाचे कर्मचारी जात आहेत.

PM Surya Ghar Yojana
PM Surya Ghar Scheme : ‘पीएम-सूर्यघर’अंतर्गत एक कोटी कुटुंबांना मिळणार मोफत वीज

तसेच पोस्टमन देखील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. त्यामुळे या योजने संदर्भात पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणात मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तसेच नांदेड विभागाचे डाक घर अधीक्षक राजीव पालेकर यांनी केले आहे. जिल्ह्यात एक मुख्य डाक घर, ५३ उपडाकघर,

PM Surya Ghar Yojana
PM Surya Ghar : आता मिळाणार मोफत ३०० युनिट वीज

४३६ शाखा डाकघर, ७७५ पोस्टमनसह असे ९१५ कर्मचारी या सर्वेक्षणासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहे.

जिल्ह्यात जास्तीत जास्त संख्येत या उपक्रमाचे सर्वेक्षणात सहभागी व्हावे. या योजनेचा लाभ घेणारा मोठा जिल्हा म्हणून नांदेड पुढे येण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. वीज बिलामध्ये मोठी कपात या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक घरावर सौर पॅनल उभे राहणे आवश्यक आहे. त्यासाठी पोस्ट विभागातर्फे सर्वेक्षण सुरू असून आत्तापर्यंत शहर व ग्रामिण भागात साडेसात हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
राजीव पालेकर, डाक घर अधीक्षक, नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com