Aslam Abdul Shanedivan
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक कोटी घरांना ३०० युनिट मोफत वीज देणाऱ्या योजनेबाबत घोषणा केली होती
यासह महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये देखील मोदी यांनी अनेक योजनांचे उद्घाटन करताना महाराष्ट्रातील दोन नव्या रेल्वे सेवांचा शुभारंभ केला होता
या सगळ्या घोषणा आणि उद्घाटन कार्यक्रम करण्यामागे लोकसभा निवडणूका असून मोदी सरकारकडून घोषणांचा पाऊस केला जात आहे
यादरम्यान 'पीएम सूर्य घर' योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
'पीएम सूर्य घर' योजनेद्वारे एक कोटी घरांना ३०० युनिट मोफत वीज मिळणार असून सर्वसामान्यांना १५००० रूपयाचा फायदा होईल
२ किलोवॅटपर्यंतच्या सौरऊर्जा प्रकल्पांसाठी सरकार ६० टक्के अनुदान देणार. तर त्यात पुन्हा १ किलोवॅट अधिक वाढवायचा असल्यास त्यावर ४० टक्के अनुदान मिळणार
'पीएम सूर्य घर' योजनेसाठी सरकारने ७५००० कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहेत. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला सुमारे ७८,००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे.