MLAs disqualification : राहुल नार्वेकर यांनी ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई पूर्ण करा ; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Shiv Sena MLAs disqualification row : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर सुनावणी झाली.
Supreme Court
Supreme Court Agrowon
Published on
Updated on

Eknath shinde Disqualification Supreme court Hearing : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर एकत्रित सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त करत अपात्रतेवर ३१ डिसेंबरपूर्वी कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

Supreme Court
Maratha Committee Meeting : मराठा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे गटातील आमदारवर अपात्रतेची मागणी केली. परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून कारवाईप्रकरणी वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्याच दरम्यान, राष्ट्रवादीमध्येही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बंड झाले. शरद पवार यांच्या गटाकडूनही बंडखोरांवर अपात्रतेची मागणी केली. या दोन्ही याचिकेवर मागील सुनावणी वेळी न्यायालयाने नार्वेकरांना कारवाईबाबत नवीन वेळापत्रक सादर करण्यास सांगितले होते. आज त्यांनी सादर केलेल्या नवीन वेळापत्रकावर देखील नाराजी व्यक्त केली.

आज सुनावणीच्या वेळी न्यायाधिशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३१ डिसेंबरपर्यंत शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राष्ट्रवादीतील आमदारांच्या अपात्रतेबद्दल १ जानेवारी २०२४ पर्यंत कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com