Nana Patole : गोरगरिबांचा आधार

Politics Update : “देशाचे फक्त दोन वर्गांत विभाजन करण्याचे काम सध्या सुरू आहे. एक गरीब आणि एक श्रीमंत. देशात ज्या काही योजना राबवल्या जातायत. त्या फक्त श्रीमंताचा विचार करून राबवल्या जात आहेत. त्यामुळे गरीब अजूनच गरीब होत चालला आहे,”
Nana Patole
Nana PatoleAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Politics : “देशाचे फक्त दोन वर्गांत विभाजन करण्याचे काम सध्या सुरू आहे. एक गरीब आणि एक श्रीमंत. देशात ज्या काही योजना राबवल्या जातायत. त्या फक्त श्रीमंताचा विचार करून राबवल्या जात आहेत. त्यामुळे गरीब अजूनच गरीब होत चालला आहे,” असे नाना पटोले यांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटले होते. नाना पटोले एवढ्या ठामपणे हे बोलू शकतात कारण त्यांच्यासमोर रोज असे अनेक लोक येतात, ज्यांना ते स्वतः मदत करतात.

दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे. मागासवर्गीय त्यांच्या हक्कांची लढाई अजूनही लढतच आहेत. योग्य रोजगारासाठी तरूण वणवण फिरतोय असे अनेक प्रश्न घेऊन लोक रोज नाना पटोले यांना भेटतात आणि नानाभाऊ त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. पटोले हे खरंच गोरगरिबांचे नेते आहेत, “आमचा आधार आहेत,” असे त्यांच्या गावातील सर्वच लोक म्हणतात. नाना पटोले कधीच कोणत्याच धर्माच्या लोकांमध्ये, जातीच्या, वर्गाच्या लोकांमध्ये भेदभाव करताना दिसत नाहीत. प्रत्येकजण आपल्या कुटुंबातील असल्यासारखेच ते प्रत्येकाशी वागतात. त्यांनी लोकांच्या प्रगतीसाठी अनेक विकास कामे केली आहेत. सोबतच ते अनेक लोकांच्या वैयक्तिक अडचणीसुद्धा दूर करण्यासाठी त्यांना मदत करतात. मग ते एखाद्या मुलाचे शाळेत अॅडमिशन करणे असो किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची भरती असो. नाना पटोले कुठल्याच बाबतीत त्यांच्या हात आखडता घेताना दिसत नाहीत.

Nana Patole
Marathwada Drought : मराठवाड्यातील दुष्काळ आणि अतिवृष्टी

जिल्हा मुख्यालय हे भंडारा जिल्ह्यात असल्यामुळे जिल्हा रूग्णालय हे भंडारा शहरात आहे. मात्र आपल्या जिल्ह्यात एक उपजिल्हा रुग्णालय उभे करावे ज्यामुळे साकोली, लाखांदूर, लाखनी या तिन्ही तालुक्यातील लोकांना याचा फायदा होईल असा गोरगरीब जनतेचा विचार नाना पटोले नेहमीच करत असतात. अनेक शेतकऱ्यांना त्यांनी आर्थिक मदत करून सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तालुक्यातील मोहरणा येथील मांदेड येथील घरांना आग लागून ते जळाल्याने मोठे नुकसान झाले. दोन कुटुंबांच्या राहत्या घराला आग लागल्याने मोठे नुकसान झाले होते. घरातील अन्नधान्य, कपडालत्ता, पैसे जळून खाक झाल्याने दोन्ही कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली होती. पटोले यांना या घटनेबद्दल समजताच त्यांनी त्वरित आर्थिक मदत देऊन त्यांच्या साथीदारांसह त्यांचा संसार पुन्हा उभा करण्यास मदत केली. ते संकटात असलेल्या लोकांच्या मागे कायम उभे राहतात.

Nana Patole
Nana Patole : शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणारे नाना पटोले

यवतमाळ तालुक्यातील हिवरी या गावातील सानिका नावाची मुलगी. तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही सुद्धा तिने तिची दहावीची परीक्षा दिली आणि संस्कृत विषयात १०० टक्के मार्क मिळवले. तिला दहावीत ९७ टक्के मिळवले. त्या मुलीचे कौतुक करण्यासाठी नाना पटोले यांनी तिला फोन करून शुभेच्छा दिल्याच, पण नाना पटोले यवतमाळला गेले असताना त्यांनी त्या मुलीची भेट घेऊन तिला आर्थिक मदतसुद्धा केली. अडचणीच्या काळात मायेने हात फिरवणारा फक्त एक माणूस आपल्या पाठीशी उभा राहावा लागतो, हे नाना पटोले जाणतात म्हणूनच ते अडचणीच्या, दुखच्या वेळी लोकांना साहाय्य करायला कायम पुढे सरसावतात.

असेच काहीसे अनिल ढोक याच्या परिवारासोबतही झाले. अनिल ढोक नोकरीनिमित्त पुण्यात आपल्या बायकोमुलांसोबत राहत होते. ते मजुरी करून आपल्या परिवारचे पोट भरत होते. परंतु एका सकाळी रस्त्याकडेला त्याच मृतदेह सापडला. त्याच्या बायकोने गावी कळवले. अनिलला शेवटचे बघता यावे, त्याचे अंत्यसंस्कार गावातच व्हावेत अशी त्याच्या आई वडिलांची इच्छा होती. पण त्याच पार्थिव पुन्हा गावी आण्यासाठीची सोय आणि पैसे त्यांच्याकडे नव्हते. नाना पटोले यांना ही बातमी कळताच त्यांनी विलंब न करता त्वरित रूग्णवाहिकेची व्यवस्था केली व सोबत काही पैसेसुद्धा पाठवले.

अनिलच्या आई वडिलांचीमुलाला शेवटच बघण्याची इच्छा नाना पटोले यांनी पूर्ण केली. साकोली येथे मांगलिक कार्यक्रमात स्वयंपाकाच्या जागी खेळताना दोन वर्षाची चिमुकली गरम वरणाच्या गंजात पडून ७० टक्के भाजली होती. कंबरेपासून पायापर्यंत भाजल्याने अतिगंभीर दुखापत झाली. तिच्यासाठीही नाना पटोले यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून वेळीच तिला मदत केली आणि त्या मुलीचा जीव वाचला. तिच्या उपचारांचा पुढील खर्चसुद्धा नाना पटोले यांनीच केला. अशा अनेक गोष्टी नाना पटोले यांनी अनेक लोकांसाठी केल्या आहेत. ज्याची नोंद सुद्धा कुठे नाही. म्हणूनच “नाना पटोले हे आमचं दैवत आहे.” असे अनेक लोक म्हणतात. नाना पटोले हे खरे समाजकारणी आहेत हे त्यांच्या या कृतीतून दिसून येते. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता ते कार्य करत राहतात. “प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याची ताकद ईश्वर मला प्रदान करो.” एवढीच इच्छा मनाशी बाळगत नाना पटोले आपले कार्य करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com