Agriculture Fertilizers : मंजूर साठ्यापेक्षा कमी खतांचा पुरवठा, नॅनो युरियाची लिंकिंग

Kharif Season : परभणी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात विविध ग्रेडच्या ३९ हजार ४२७ टन खतांचा पुरवठा झाला आहे. मंजूर खतसाठ्याच्या तुलनेत कमी पुरवठा झाल्यामुळे सद्यःस्थितीत डीएपी व १०ः२६ः २६ या ग्रेडच्या खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
Agriculture Input
Agriculture InputAgrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात विविध ग्रेडच्या ३९ हजार ४२७ टन खतांचा पुरवठा झाला आहे. मंजूर खतसाठ्याच्या तुलनेत कमी पुरवठा झाल्यामुळे सद्यःस्थितीत डीएपी व १०ः२६ः २६ या ग्रेडच्या खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील खतांचे काही विक्रेत्यांकडून खतांसोबत (लिंकिंग) नॅनो युरिया खरेदीची सक्ती केली जात आहे.

यंदाच्या (२०२४) खरीप हंगामासाठी (एप्रिल ते सप्टेंबर) कृषी आयुक्तालयाकडून परभणी जिल्ह्याला विविध ग्रेडच्या १ लाख ३७ हजार ४०० टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे. त्यात युरिया ३६ हजार २०० टन, डीएपी २४ हजार ४०० टन, पोटॅश-एमओपी ३ हजार १०० टन, सुपर फॉस्फेट १६ हजार टन, संयुक्त खते-एनपीके ५६ हजार ७०० टन या खतांचा समावेश आहे. जून महिन्यासाठी मंजूर खतसाठ्यामध्ये युरिया ८ हजार ३२६ टन, डीएपी ७ हजार ६२० टन, पोटॅश ७१३ टन, एनपीके १५ हजार ८७६ टन, सुपर फॉस्फेट ४ हजार ८० टन या खतांचा समावेश आहे.

Agriculture Input
Agriculture Fertilizers Stocks : ‘पणन’ला खतांचा अतिरिक्त कोटा द्या : अजित पवार

यंदाच्या एप्रिल पासून ३९ हजार ४२७ टन खतांचा पुरवठा झाला. त्यात युरिया १५ हजार ७५३ टन, सुपर फॉस्फेट ५ हजार ३४९ टन, डीएपी ५ हजार ४१२ टन, एनपीके १२ हजार ९१३ या खताचा समावेश आहे. मार्च अखेरचा व यंदाच्या हंगामातील पुरवठा झालेला मिळून एकूण १ लाख ५ हजार २०३ टन पैकी १६ हजार ५८४ टन खताची विक्री झाली असे कृषी विभागाकडील आकडेवारीकरून स्पष्ट होत आहे. परंतु अनेक खत विक्रेते विशेषतः ग्रामीण भागातील विक्रेते खतांची विक्रीसाठी पॉझ मशिनचा वापर करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खत साठ्याबाबतची माहिती अद्ययावत होत नाही.

Agriculture Input
Agriculture Fertilizers : खतांचा २.२१ लाख टन पुरवठा मंजूर
आमच्या भागातील शेतकऱ्यांना डीएपी मिळत नाही. नॅनो युरियाची गरज नसतांना विक्रेते घेण्यास भाग पाडत आहेत. पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात डीएपी तसेच इतर खते उपलब्ध करुन द्यावीत. लिंकिंग बंद करावी.
बालाजी देशमुख, भोगावदेवी, ता. जिंतूर, जि. परभणी
युरिया तसेच संयुक्त खते (एनपीके) उपलब्ध आहेत. येत्या आठवडाभरात जिल्ह्यात सुमारे तीन हजार टन डीएपी उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. नॅनो युरिया खरेदी करणे बंधनकारक नाही.
दीपक सामाले, जिल्हा कृषी विकास अधिकारी, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com