Fertilizers Sale : बफर साठ्यापैकी ७० टक्के खत विक्रीसाठी खुला

Fertilizers Stock Update : बीड जिल्ह्यासाठी उपलब्ध करून ठेवण्यात आलेल्या खताच्या साठ्यातील ७० टक्के म्हणजेच ४०४५ टन युरिया व १३०४ टन डीएपी खताचा साठा खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Agriculture Fertilizer
Agriculture FertilizerAgrowon
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यासाठी उपलब्ध करून ठेवण्यात आलेल्या खताच्या साठ्यातील ७० टक्के म्हणजेच ४०४५ टन युरिया व १३०४ टन डीएपी खताचा साठा खुला करण्याचा निर्णय बुधवारी (ता. १०) जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Agriculture Fertilizer
Fertilizer Management : माती परीक्षण करूनच खत व्यवस्थापन करा

या वेळी अधीक्षक कृषी अधिकारी जेजुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी, विक्रेते संघटना अध्यक्ष अंगद नवले, एमएआयडीसी जिल्हा प्रतिनिधी, जिल्हा पणन अधिकारी, आरसीएफ इफ्को व इतर प्रतिनिधी, तसेच कृषी विकास अधिकारी सायप्पा गरंडे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक कल्याण अंबुरें, सर्व उप विभागीय कृषी अधिकारी उपस्थिती होते. यंदाच्या वाढीव बफर साठ्यानुसार त्यातून विविध कंपन्यांकडून खत उपलब्ध झाले आहे.

Agriculture Fertilizer
Fertilizers Shortage : जळगावात खतांची भीषण टंचाई

यासाठी पूर्वीची महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ व नव्याने जिल्हा पणन अधिकारी या नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी अनुक्रमे ४०४५ व १३०४ टन युरिया, तर ८५५ टन व १७४ टन बफर साठा करून ठेवला आहे.

आजचे बैठकीत खुला करण्यात आलेल्या साठ्याचे परिमाण साधारणतः ३७५० टन युरिया व ७२० टन डीएपी असा एकूण ४२७० टन साठा खुला करण्यात येईल. म्हणजे साधारण दोन रेल्वे रॅक तथा ४२७ ट्रक साठा जिल्ह्यातील विविध भागांत वितरित होईल.

गरजेनुसार पुढील टप्प्यात साधारण १८० ट्रक खताचा बफर साठा खुला करण्यात येईल. खत विक्री करण्यासाठी परवाना प्राप्त शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्राधान्य देण्यात येईल. बफर साठा वितरणाचे अधिकार तालुका समितीस देण्यात आले आहेत.

ज्या कृषी सेवा केंद्र/शेतकरी उत्पादक कंपन्यांना बफर साठ्यातील युरिया व डीएपी हवा आहे, त्यांनी त्यांची मागणी तालुक्याचे कृषी अधिकारी पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांचे संयुक्त समितीशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com