Nagar News : नगर जिल्ह्यातील खरिपासाठी कृषी विभागाने केलेल्या मागणीनुसार खताची यंदा पंचवीस टक्के खतांचा पुरवठा झाला आहे. गेल्या वर्षीचे मोठ्या प्रमाणात खत शिल्लक असल्याने खरिपात अडचण आली नाही.
यंदाच्या पुरवठ्यापेक्षा गतवर्षीच्या शिल्लक खतावर खरिपाची मदार असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीच्या शिल्लकासह यंदाचा पुरवठा मिळून सध्या १ लाख ८७ हजाटन खतात उपलब्ध झाले असून आतापर्यत ३३ हजार टन खताची विक्री झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
नगर जिल्ह्यात खरिपाचे सरासरी ५ लाख १ हजार ४७४ सरासरी क्षेत्र आहे. गेल्या तीन वर्षांतील खरीप पेरणी स्थिती पाहता यंदा ७ लाख २ हजार हेक्टरवर पेरणी, कापूस लागवड होण्याचा कृषी विभागाने अंदाज गृहीत धरून बियाणे, खताची मागणी केली होती. मागील वर्षी पावसाने बराच ताण देऊनही ५ लाख ८६ हजार ३५८ हेक्टरवर खरिपात पेरणी झाली होती. यंदा दर वर्षीच्या तुलनेत पावसाचे लवकर आगमन झाले आहे.
शिवाय चांगला पाऊस झाल्याने कापूस लागवड, पेरणीला लवकर सुरुवात झाली आहे. यंदा कृषी विभागाने खरिपासाठी युरियाची १ लाख १२ हजार ९२९ टनाची मागणी केली होती, त्यात ७५ हजार ४०० टनाला मंजुरी मिळाली पण प्रत्यक्षात ३१ हजार ८१० टन खत उपलब्ध झाले. २९ हजार ७०८ टन मागणी युरिया शिल्लक असल्याने ६१ हजार ५१८ टन खत उपलब्ध झाले असून २० टन खताची विक्री झाली आहे.
एमओपीची १७ हजार १९८ टनांची मागणी केली. ३९६० टन पुरवठा झाला, मागील ४४६१ टन शिल्लक असल्याने ८ हजार ५०० टन खत पलब्ध झाले. त्यातील १४९१ टन खताची विक्री झाली आहे. संयुक्त खताची ८६ हजार टनाची मागणी केली. ९८ हजार टन खत मंजूर झाले. १९ हजार टनाची उपलब्धता झाली तर मागणी वर्षाचे ६३ हजार टन खत शिल्लक होते. त्यामुळे संयुक्त खतही पुरेसे उपलब्ध झाले.
यंदा आतापर्यंत खरिपात ३२ हजार २२४ टनांची विक्री झाली असून आताही १ लाख ५४४ हजार ८८६ टन खत उपलब्ध आहे. मात्र यंदाच्या पुरवठ्याचा विचार केला तर मागील शिल्लक खतांवर खरिपाची मदार असल्याचे दिसून आले. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खताचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे यंदा खताचीविक्री आतापर्यंत तरी कमीच झाली आहे.
नगर जिल्ह्यातील स्थिती
खताची मागणी : २ लाख ८० हजार ७३९ टन
पुरवठा मंजुरी : २ लाख ३२ हजार २२०
प्रत्यक्ष प्राप्त साठा : ६२ हजार ३८५
मागील शिल्लक : १ लाख २४ हजार ७२५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.