Pre-Monsoon Rains Parbhani : पूर्वमोसमी पावसाचा ४७१ हेक्टरवरील पिकांना तडाखा

Pre-monsoon Rains : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील १२६ गावातील ८१९ शेतकऱ्यांच्या बागायती तसेच फळपिके मिळून एकूण ४७१.७४ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले.
Pre-Monsoon Rains Parbhani
Pre-Monsoon Rains Parbhaniagrowon
Published on
Updated on

Parbhani Rain : यंदाच्या मे महिन्यात पूर्वमोसमी पाऊस,वेगाचे वारे यामुळे सोमवार (ता. १९) पर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील १२६ गावातील ८१९ शेतकऱ्यांच्या बागायती तसेच फळपिके मिळून एकूण ४७१.७४ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मे महिन्यात परभणी व हिंगोली जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वेगाच्या वाऱ्यामुळे केळी, आंबा या प्रमुख फळपिकांसह हळद, भुईमूग, बागायती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू ,मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ७ तालुक्यातील ४०.२७ हेक्टरवरील बागायती पिके आणि ३८६.६७ हेक्टरवरील फळपिकाचे मिळून एकूण ४३६.९४ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Pre-Monsoon Rains Parbhani
Parbhani Water Shortage : परभणीतील सात लघू तलाव पडले कोरडे

नुकसानीचे पंचनामे सुरू झाले नव्हते. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच अंतिम बाधित क्षेत्र व शेतकरी संख्या निश्‍चित होईल. वीज कोसळल्यामुळे १ व्यक्तीचा मृत्यू झाला तर १ व्यक्ती जखमी झाली. दुधाळ १४ आणि ओढ काम करणारी ७ मिळून २१ जनावरे दगावली, असे महसूलच्या सूत्रांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यात १५५ शेतकरी बाधित....

पूर्वमोसमी पावासाचा हिंगोली जिल्ह्यातील २ तालुक्यातील ५ गावातील १५५ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. वसमत तालुक्यातील १६.८० हेक्टर व कळमनुरी तालुक्यातील १८ हेक्टर फळपिके मिळून एकूण ३४.८० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीज कोसळून सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे महसूलच्या सूत्रांनी सांगितले.

परभणी जिल्हा प्राथमिक नुकसान क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका बाधित गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्र

परभणी ३९ ३७२ २२५

जिंतूर १ १ ५

सेलू ८ ५३ ३५.१४

मानवत १४ ४० ४१

पाथरी ४ ३७ २७

सोनपेठ २९ ९० ६१.३५

पूर्णा २६ ७१ ४२.४५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com