Sunflower Cultivation : रब्बी हंगामातील सूर्यफूल लागवड

Rabi Season : सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेचा परिणाम न होणारे हे पीक म्हणून सूर्यफूल लागवड केली जाते. कोणत्याही हंगामात, कोणत्याही कालावधीत सूर्यफूल लागवड केली तरी पीक उत्पादनावर कोणताही ‍परिणाम होत नाही.
Sunflower
SunflowerAgrowon
Published on
Updated on

डॉ. अनिल राजगुरू, डॉ. आदिनाथ ताकटे

Sunflower Farming : सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेचा परिणाम न होणारे हे पीक म्हणून सूर्यफूल लागवड केली जाते. कोणत्याही हंगामात, कोणत्याही कालावधीत सूर्यफूल लागवड केली तरी पीक उत्पादनावर कोणताही ‍परिणाम होत नाही. पेरणीजोग्या ओलाव्यानंतर पावसाने दिलेल्या ताणामुळे पीक मोडणी करावी लागल्यावर किंवा उशिराच्या पावसामुळे पेरणीस विलंब होत असेल तर मध्य हंगाम दुरुस्तीसाठी सूर्यफूल लागवड उत्तमच पर्याय ठरते.

जमीन

लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी.

पूर्वमशागत

खोल नांगरट करून कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी २० ते २५ गाड्या प्रमाणे जमिनीत मिसळावे.

पेरणीची वेळ

रब्बी सूर्यफुलाची नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी. सूर्यफूल हे पीक प्रकाश असंवेदनशील असल्याने मध्य हंगाम दुरुस्ती म्हणून तसेच पाऊसमान बघून शिफारशीत वेळे आधी किंवा नंतर सोयीनुसार केव्हाही पेरणी करता येते.

Sunflower
Sunflower Sowing : पुणे विभागात आठ हजार हेक्टरवर सूर्यफुलाची लागवड

पेरणीचे अंतर

मध्यम ते खोल जमीन : ४५ बाय ३० सेंमी

भारी जमीन : ६० बाय ३० सेंमी

संकरित वाण : ६० बाय ३० सेंमी

पेरणी पद्धत

कोरडवाहू पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते.

बियाणे ५ सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये.

बागायती लागवड सरी वरंबा वरंब्यावर टोकण पद्धतीने करावी.

बियाणे प्रमाण (हेक्टरी)

सुधारित वाण : ८ ते १० किलो

संकरित वाण : ५ ते ६ किलो

बीजप्रक्रिया

मर रोगाच्या प्रतिबंधासाठी २ ते २.५ ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणूखत प्रत्येकी २५ ग्रॅम प्रमाणे प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.

रासायनिक खते

कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी २.५ टन शेणखत तसेच ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून घ्यावे.

बागायती पिकास हेक्टरी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश द्यावे व उरलेल्या ३० किलो नत्र पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावे.

गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडुळ खतातून द्यावे.

आंतरमशागत

पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन रोपांतील अंतर ३० सेंमी ठेवून विरळणी करावी. पेरणीनंतर १५ दिवसांनी एक खुरपणी तसेच दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी.

Sunflower
Sunflower Cultivation : अतितमध्ये सूर्यफुलाची यंदा २५ एकरवर लागवड

महत्त्वाच्या बाबी

पीक फुलोऱ्यात असताना सकाळी ७ ते ११ या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरून हळुवार हात फिरवावा. म्हणजे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.

परागीभवन होण्यासाठी प्रति हेक्टरी ४ ते ५ मधमाश्यांच्या पेट्या ठेवाव्यात.

सूर्यफूल पिकाची फेरपालट करावी. सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जातात. त्यामुळे दरवर्षी एकाच जमिनीत सूर्यफूल पीक घेतल्यास जमिनीचा पोत बिघडून उत्पादन क्षमता खालावते. तसेच रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी कमीत कमी ३ वर्षे तरी त्याच जमिनीत सूर्यफुलाचे पीक घेऊ नये.

पीक फुलोऱ्यात असताना रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू नये.

वाण निवड

वाण कालावधी (दिवस) सरासरी उत्पादन (क्विं/हे.) वैशिष्ट्ये

अ) सुधारित वाण

भानु ८५ ते ९० १२ ते १३ सर्व हंगामासाठी तसेच अवर्षण प्रवण विभागासाठी योग्य

फुले भास्कर ८० ते ८५ १६ ते १८ अवर्षण प्रवण भागास योग्य, अधिक उत्पादन, तेलाचे प्रमाण अधिक, काळेभोर दाणे

डी.आर.एस.एफ.- १०८ ९५ ते १०० १५ ते १६ संपूर्ण भारतासाठी प्रसारित, अधिक तेल प्रमाण

डी.आर.एस.एफ. - ११३ ९२ ते ९८ १६ ते १८ संपूर्ण भारतासाठी प्रसारित, अधिक उत्पादन

ब) संकरित वाण

के.बी.एस.एच.१ ८५ ते ९० १२ ते १५ तेलाचे प्रमाण अधिक, अधिक उत्पादन

एल.डी.एम.आर.एस.एच.१ ८५ ते १०२ १० ते १२ केवडा रोगास प्रतिकारक्षम, लवकर तयार होणारे वाण

एल.डी.एम.आर.एस.एच. ३ ९५ १०० १० ते १४ केवडा रोगास प्रतिकारक्षम, मराठवाडा विभागासाठी

एम.एस.एफ.एच. ८ ९५ ते १०० १४ ते १६ उत्पादन स्थिरता अधिक

एम.एस.एफ.एच. १७ १०० ते १०५ १२ ते १५ अधिक उत्पादन क्षमता, बियावर पांढऱ्या रेषा

के.बी.एस.एच.४४ ९० ते ९५ १४ ते १६ अधिक उत्पादन क्षमता

फुले रविराज ९० ते ९५ १७ ते २० पश्चिम महाराष्ट्रात खरीपात उशिरा पेरणीसाठी प्रसारित, अधिक उत्पादनक्षम, बड नेक्रॉसिस रोगास प्रतिकारक्षम

एल.एस.एफ.एच.१७१ ९० ते ९५ १८ ते २० अधिक उत्पादन देणारा वाण, केवडा रोगास प्रतिकारक्षम

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

- डॉ. अनिल राजगुरू, ९४२३३३५६३१ (कृषी वनस्पतिशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे )

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com