Summer Crop : उन्हाळी पिकांत भुईमूग, तीळ पिकांना पसंती

Summer Crop Update : कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत २१ हजार ४९५ हेक्टरवर भुईमूग तर ४ हजार १३० हेक्टरवर तीळ पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.
Summer Crop
Summer CropAgrowon

Latur News : कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत २१ हजार ४९५ हेक्टरवर भुईमूग तर ४ हजार १३० हेक्टरवर तीळ पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. सरासरी ७१ हजार ७०० क्षेत्राच्या तुलनेत पाचही जिल्ह्यांत प्रत्यक्षात ४३ हजार १८३.७२ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पेरणी झाली आहे.

यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी लातूर कृषी विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांत उन्हाळी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर इतके होते. त्या तुलनेत ४३१८३.७२ म्हणजे सरासरीच्या ६०.२३ टक्के उन्हाळी पिकांची पेरणी झाली. त्यात शेतकऱ्यांनी भुईमुगाला सर्वाधिक पसंती दिली आहे.

Summer Crop
Summer Sowing : उन्हाळी पिकांची १६ हजार हेक्टरवर पेरणी

पाचही जिल्ह्यांत भुईमुगाचे सरासरी क्षेत्र २६३८८ हेक्टर असताना प्रत्यक्षात २१४९५.६२ हेक्टर म्हणजे सरासरीच्या तुलनेत ८१ टक्के क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी झाली. भुईमुगाचे पीक सध्या रोप अवस्थेत आहे.

पाचही जिल्ह्यात मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ८०५७ हेक्टर असताना ५८४५.७० हेक्टर म्हणजे सरासरीच्या तुलनेत ७२.५५ टक्के क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे. उन्हाळी तिळाची सरासरी क्षेत्र १३५८ हेक्टर असताना प्रत्यक्षात ४१३० हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरीच्या तीन पट पेरणी झाली आहे.

Summer Crop
Summer Sowing : उन्हाळी पिकांच्या ६३ टक्के पेरण्या

उन्हाळी सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १६१५५ हेक्टर असताना २४३१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. इतर गळीत धान्याची देखील जवळपास ५१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सूर्यफुलाची ४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. इतर पेरणी क्षेत्रांमध्ये ८ हेक्टरवर इतर कडधान्य, १४५ हेक्टरवर उडीद, ४३६ हेक्टरवर मूग, १३५ हेक्टरवर बाजरी, ७७१३ हेक्टरवर ज्वारी, ७४२ हेक्टरवर उन्हाळी भाताची पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले.

जिल्हानिहाय तिळाचे

पेरणी क्षेत्र (हेक्टर)

लातूर ३.४०

धाराशिव ०००

नांदेड ४१२५

परभणी २.००

हिंगोली ०००

ज्वारीचे जिल्हानिहाय

क्षेत्र (हेक्टर)

लातूर २३९

धाराशिव २४२

नांदेड ६९०६

परभणी ४४

हिंगोली २८२

जिल्हानिहाय भुईमूग

पेरणी क्षेत्र (हेक्टर)

लातूर ६३४.१०

धाराशिव २४५.५०

नांदेड ७५८२

परभणी ३१.२०

हिंगोली ९९३२.८२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com