Rainfed Farming : कोरडवाहू शेती तंत्रज्ञानात सुधारणेसाठी सूचना अपेक्षित

Agriculture Technology : Suggestions for improvement in rainfed farming technology are expected
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्र, गादी वाफ्यावर टोकन पद्धतीने लागवड, एकाआडएक मृत सरी काढणे, पावसाच्या खंडकाळात शेततळ्यांची संरक्षित पाण्याचा वापर तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले अवर्षणाच्या स्थिती तग धरुन राहणारे विविध पिकांचे वाण यामुळे कोरडवाहू शेतीतील उत्पादकतेत वाढ झाली.

कृषी हवामान सल्ला पत्रिकेमुळे शेतकऱ्यांना पेरणी ते काढणी तसेच काढणी पश्चात नियोजन करण्यास मदत होत आहे.येत्या काळात कोरडवाहू शेतीतील तंत्रज्ञानात आणखीन सुधारणा करण्यासाठी शेतकरी तसेच कृषी विज्ञान केंद्रांकंडून सूचना अपेक्षित आहेत असा सूर शनिवारी (ता. १४) शास्त्रज्ञ तसेच शेतकऱ्यांनी आळविला.

Agriculture Technology
Floriculture Technology : पावसाच्या प्रदेशात यशस्वी पॉलिहाउसमधील जरबेरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधन संचालनालयामध्ये मराठवाडा विभागासाठी कोरडवाहू शेती तंत्रज्ञान शेतकरी लाभार्थी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कुलगुरू तथा अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान शास्त्र संशोधन प्रकल्प तथा अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या आठव्या पंचवार्षिक आढावा समितीचे सदस्य डॉ.इंद्र मणी मिश्रा, ओडिसी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन.पशुपालक, समितीचे सचिव डॉ. जी. रवींद्र चारी, आयसीएआर अंतर्गंत हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था (क्रीडा) अंतर्गंत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प समन्वयक डॉ. जेव्हिएनएस प्रसाद,

डॉ. एस. के. बाल, संशोधन संचालक डॉ. के. एस. बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. व्ही. आसेवार, आत्माचे प्रकल्प संचालक तथा प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, रवी हरणे, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. डब्लू. एन. नारखेडे, डॉ. आनंद गोरे, कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे, ज्वार पैदासकार डॉ. एल. एन. जावळे, डॉ. पी. एच. गौरखेडे, मराठवाड्यातील कृषी विज्ञान केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विस्तार केंद्राचे प्रमुख, शेतकरी ज्ञानोबा पारधे (बाभुळगाव), भारत आव्हाड (ब्रम्हपुरी), आवडाजी गमे (सोन्ना) उपस्थित होते.

Agriculture Technology
Rainfed Crop cultivation : कसं असाव कोरडवाहू पिकांच नियोजन?

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की हवामान बदलाच्या स्थितीत कोरडवाहू शेती पद्धतीत पीक व्यवस्थापनाला अत्यंत महत्त्व आहे.कोरडवाहू शेती तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी करण्यासाठी शेतकरी, कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ,कृषी विभागाकडून सूचना अपेक्षित आहेत.

डॉ. पसुपालक म्हणाले, की कृषी विद्यापीठाकडून आणखीन काय अपेक्षा आहेत हे शेतकऱ्यांनी कळविले पाहिजे. यावेळी या समितीकडून प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या फायद्याबद्दल तसेच येणाऱ्या अडचणी बाबत माहिती जाणून घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com