Rainfed Crop cultivation : कसं असाव कोरडवाहू पिकांच नियोजन?

Team Agrowon

कोरडवाहू शेतीतील हेक्टरी उत्पादन वाढविणे, प्रतिकूल वातावरणात उत्पादन चांगले मिळणे आणि उत्पादन खर्च कमी करणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

Rainfed Crop cultivation | Agrowon

कोरडवाहू जमिनीत उपलब्ध असलेल्या पाण्याचा कार्यक्षम उपयोग करुन घेण्यासाठी जमीन व्यवस्थापन आणि पीक पद्धतीचे योग्य नियोजन करणं गरजेचं आहे.

Rainfed Crop cultivation | Agrowon

पेरणीपुर्वी मशागत, आंतरमशागत तर आपण करतोच पण याशिवाय एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक तण नियंत्रण आणि पीक संरक्षणाबरोबरच शेतात जंलसंधारणाची कामे करुन घ्यावीत. यामध्ये मुलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा.

Rainfed Crop cultivation | Agrowon

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी बांध बंदिस्ती, ओघळ आणि नाल्यासह इतर उपचाराची निगा व दुरुस्ती पावसाळ्यापुर्वीच करावी.

Rainfed Crop cultivation | Agrowon

आपली जमीन आणि आपल्या भागात होणाऱ्या पाऊसमानानुसार आत्ताच पीक पद्धतीची निवड करुन ठेवावी. यामध्ये मध्यम ते भारी जमीनीत कापूस, तूर, खरीप ज्वारी व सोयाबीन सारखी पिके घ्यावीत.

Rainfed Crop cultivation | Agrowon

मध्यम जमिनीत सुर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी यासारखी पिके घ्यावीत. तर हलक्या जिमिनीत बाजरी, कुळीथ, यासारखी पिके घ्यावीत.

Rainfed Crop cultivation | Agrowon

आंतरपीक पद्धतीमध्ये संकरित ज्वारी अधिक तुर (४:२), बाजरी अधिक तूर (३:३),सोयाबीन अधिक तुर (४:२), कापुस अधिक उडीद किंवा सोयाबीन (१:१) यासारखी आंरपिके घ्यावीत.

Rainfed Crop cultivation | Agrowon