Sugarcane Crop Protection: पाचट आच्छादनातून उसाचे संरक्षण

Sugarcane Mulching: समर्थ सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर तुकाराम जाधव यांनी पाचट आच्छादनातून प्रतिकूल हवामान व मर्यादित पाणी उपलब्धतेच्या परिस्थितीत आठ एकर उसाचे संरक्षण करण्यात यश मिळवले आहे.
Sugarcane  Crop
Sugarcane CropAgrowon
Published on
Updated on

Jalna News: समर्थ सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर तुकाराम जाधव यांनी पाचट आच्छादनातून प्रतिकूल हवामान व मर्यादित पाणी उपलब्धतेच्या परिस्थितीत आठ एकर उसाचे संरक्षण करण्यात यश मिळवले आहे.

अतिवृष्टीमुळे २०२४ मध्ये तलाव भरले असले तरी कालांतराने पाण्याची टंचाई भासू लागली. फेब्रुवारी २०२५ मध्ये श्री. जाधव यांचा ऊस गळितासाठी कारखान्याकडे गेला. त्यानंतर खोडवा ऊस टिकेल की नाही याबाबत शंका निर्माण झाली. ही अडचण त्यांनी कारखान्याच्या शेतकी विभागातील अधिकारी महेश झिंजुर्डे यांच्याकडे मांडली. त्यांनी पाचट न जाळता त्याचे आच्छादन करण्याचा पर्याय सुचवला, जो उसाच्या मुळांचे तापमान संतुलित ठेवून मातीतील ओलावा टिकवतो आणि सेंद्रिय खत निर्मितीलाही मदत करतो.

Sugarcane  Crop
Ai Sugarcane Farming: ‘एआय’ ऊसशेतीचा प्रयोग देशभर

श्री. जाधव यांनी या सल्ल्यानुसार आठ एकर क्षेत्रांवर पाचटाचे आच्छादन केले. त्यासोबत त्यांनी एकरी १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो युरिया आणि समर्थ कारखान्याचे ५० किलो पोटॅश खत वापरले. त्यांच्या शेतात ठिबक सिंचन प्रणालीअंतर्गत एकूण १६ प्लॉट असून, पाणी फक्त चार तास उपलब्ध असल्यामुळे दररोज दोन प्लॉटना दोन-दोन तास पाणी दिले जाते.

Sugarcane  Crop
Sugarcane Trash Management : ऊस पाचट कुजविण्याचे तंत्र

यामुळे प्रत्येक प्लॉटला आठव्या दिवशी पाणी मिळते. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रयोग सातत्याने सुरू असून, उसाची वाढ समाधानकारक झाली आहे आणि सेंद्रिय खत निर्मितीलाही सुरुवात झाली आहे. श्री. जाधव यांचे म्हणणे आहे, की जर हा प्रयोग केला नसता, तर फक्त दोन एकर ऊसच वाचला असता आणि मोठे आर्थिक नुकसान झाले असते.

उसाचे पाचट न जाळता शेतकऱ्यांनी त्याचे आच्छादन व सुचविल्यानुसार प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्याला प्राधान्य द्यायला हवे. ज्ञानेश्वर जाधव एक कृतिशील शेतकरी म्हणून पुढे आले. त्यांनी पाचट आच्छादन व सेंद्रिय खत तयार करण्यासाठी प्रयत्न केले. त्याचे परिणाम त्यांना दिसत आहेत.
महेश झिंजुर्डे, शेती अधिकारी, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर, जि. जालना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com