
Sangli News: सागंली जिल्ह्यात गतवर्षी अतिपावसामुळे ऊस लागवड लांबणीवर पडली होती. त्याचा फटका आडसाली ऊस लागवडीला बसला होता. यंदाच्या हंगामात १ लाख ९ हजार ५४८ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. मात्र, अतिपाऊस आणि पाण्याच्या टंचाईमुळे जिल्ह्यात उसाचे क्षेत्र कमी होण्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात उसाचे सरासरी क्षेत्र १ लाख ३५ हजार हेक्टर आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या भागात मे महिन्यापासून उसाची लागवड सुरू झाली. दरम्यान, जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मुसळधार पाऊस पडल्याने आडसाली हंगामातील ऊस लागवडीस अडथळा निर्माण झाला होता.
परंतु सततच्या पावसामुळे उसाची वाढ खुंटली असून अपेक्षित फुटवे मिळाले नाहीत. आडसाली हंगामात ३६ हजार ८४ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. सर्वाधिक वाळवा तालुक्यात या हंगामातील ऊस लागवड आहे. दरम्यान, जिल्ह्यात परतीचा आणि मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली.
डिसेंबरअखेर ऊस लागवड संथ गतीनेच सुरू होती. त्यानंतर पूर्व आणि सुरू हंगामातील ऊस लागवड सुरू झाली होती. नुकताच संपलेल्या हंगामात १ लाख ३७ हजार १०४ हेक्टरवरील उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. यंदा अतिपाऊस आणि सध्या पाण्याची टंचाई दोन्ही संकटाचा फटका ऊस लागवडीवर बसला आहे.
तालुकानिहाय ऊस लागवड दृष्टिक्षेप (क्षेत्र हेक्टरमध्ये)
तालुका डसाली पूर्वहंगामी सुरू खोडवा
मिरज ४०९८ ३४२४ १२३१ ६७८७
जत ३१.७ ३८३०.८ १९६८.२ ६०८३.८
खानापूर ३०५५ १०५० ४२५ २६५०
वाळवा १४९३४ २८८० ५१० २०५०
तासगाव २३८१ १८७४ १५० ५५३६
शिराळा ११५० २०७१ ११० १५००
आटपाडी ४३० ८१९ ४९ २४९
कवठेमहांकाळ ७३० १९७४ १४०५ २६३७
पलूस ३७५८ २३३८ १०५० ६४९०
कडेगाव ५५१७ २३४३ २११६ ७८६०
एकूण ३६०८४ २२६०६ ९०१४ ४१८४२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.