Sugarcane Farming : दुष्काळी भागात ऊस लागवडीची संदिग्धता ; सांगली जिल्ह्यात ८३ हजार हेक्टरवर लागवड
Sangali News : सांगली : जिल्ह्यात ऊस लागवडीला गती आली आहे. दुष्काळी भागातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यांत सुरू हंगामातील ऊस लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. मात्र, दुष्काळी भागातील मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा घटल्याने पाण्याची उपलब्धता पाहूनच शेतकरी ऊस लागवडीचे नियोजन करू लागला असोला तरी ऊस लागवडीबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
गतवर्षी जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षी गाळपाला चालणाऱ्या उसाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील आडसाली हंगाम आणि पूर्व हंगाम या दोन्ही हंगामातील ऊस लागवड पूर्ण झाली आहे. आडसाली उसाची ३६ हजार ८३ हेक्टर, तर पूर्व हंगामाचे १८ हजार ९९३ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. शेतकरी ऊस लागवडीची नोंद कारखान्यांकडे करत आहेत. त्यामुळे दोन्ही हंगामातील ऊस क्षेत्र वाढणार
आहे.
जिल्ह्यात आडसाली, पूर्व हंगाम आणि सुरू हंगामातील ८३ हजार ७९८ हेक्टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी भागात देखील परतीचा आणि मॉन्सूनोत्तरी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पाणीसाठा वाढला. सिंचन योजनांचे पाणीही सोडले जात आहे. यामुळे जत, आटपाडी कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकरी ऊस लागवड करण्यासाठी पुढे येऊ आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा तब्बल १८ टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळे येत्या काळात संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाई भासू नये यासाठी जिल्ह्यातील टेंभू ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजनेच्या आवर्तन सुरू आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाण्याची उपलब्धता पाहूनच दुष्काळी भागातील शेतकरी ऊस लागवडीचे नियोजन करत असल्याचे चित्र आहे.
तालुकानिहाय
ऊस लागवड दृष्टिक्षेप
तालुका क्षेत्र (हेक्टर)
मिरज १४५७३
जत १४३९
खानापूर ४४८०
वाळवा १७८१४
तासगाव ९७९१
शिराळा ३२२१
आटपाडी १५४७
कवठेमहांकाळ ५१२६
पलूस १००९६
कडेगाव १५७२०
एकूण ८३७९८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.