Sugarcane Labour : उसतोड मुजरांची मुले शाळा सोडून फडातच ; सर्व्हेक्षणात धक्कादायक वास्तव

Sugarcane Laborers Children's Education : कोल्हापुरातील ११ साखर कारखान्यांमधील सर्व्हेक्षणात तब्बल १८३९ मुले-मुली शाळा सोडून उसाच्या फडात असल्याचे समोर आले आहे.
Sugarcane Labour
Sugarcane LabourAgrowon

Pune News : उसतोड मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी समग्र शिक्षाअंतर्गत बीड जिल्ह्यात २२० हंगाामी वसतीगृहे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, 'अवनी' स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

कोल्हापुरातील ११ साखर कारखान्यांमधील सर्व्हेक्षणात तब्बल १८३९ मुले-मुली शाळा सोडून उसाच्या फडात असल्याचे समोर आले आहे. एकट्या कोल्हापुरातच इतक्या संख्येने मुले शाळाबाह्य आढळून येत असतील तर, राज्यातील सर्व कारखान्यांचे सर्व्हेक्षण केल्यास हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sugarcane Labour
Hostel Scheme : उसतोड मजुरांच्या मुलांसाठी ६२ वसतिगृहे उभारणार ; शासन निर्णय जारी

दरवर्षी साखर हंगामात ऊस तोडणीसाठी राज्यातील उसतोड मजूरांना स्थलांतिरत व्हावे लागते. परिणामी उसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. उसतोड मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी समग्र शिक्षाअंतर्गत मजुरांच्या मुलांसाठी हंगामी वसतीगृहे सुरू करण्यात आली आहेत.

बीड जिल्ह्यात अशा प्रकारची २२० वसतीगृहे सुरू करण्यात आली आहे. या वसतीगृहांमध्ये २१ हजार ४९० मुले असल्याचा दावा बीड शिक्षण विभागाने केला आहे. मात्र, अवनी संस्थने कोल्हापुरातील ११ कारखान्यांमध्ये केलेल्या सर्व्हेक्षणामुळे शिक्षण विभागाचा दावा फोल ठरला आहे.

Sugarcane Labour
Sugarcane Labor : ऊसतोड कामगारांना सव्वातीन कोटींची मदत

संस्थने कोल्हापुरातील ११ कारखान्यांवर जावून सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणात ० ते १८ वयोगटातील अंगणवाडी आणि शाळांमध्ये शिकणारी तब्बल १८३९ मुले-मुली शाळाबाह्य आढळून आली आहेत. संस्थेने या शाळाबाह्य मुलांची यादी बीडच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे तत्तवशील कांबळे आणि जागर प्रतिष्ठानचे अशोक तांगडे यांच्याकडे पाठवली आहे. आता या प्रकरणी त्यांच्याकडून उलट तपासणी सुरू आहे.

कोल्हापुरातील ११ साखर कारखान्यांतील सर्व्हेक्षणातून मोठ्या प्रमाणात उसतोड मजुरांची मुले शाळाबाह्य असल्याचे समोर आल्याने बीड शिक्षण विभागाचा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे उसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्याचे प्रयत्न अयशस्वी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com