Sugarcane Labor
Sugarcane LaborAgrowon

Sugarcane Labor : ऊसतोड कामगारांना सव्वातीन कोटींची मदत

Sugarcane Season : ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे शासनाने जाहीर केले आहे.
Published on

Pune News : ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासंदर्भात महामंडळाकडे राज्यातून प्राप्त ६७ प्रकरणांमध्ये प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे एकूण ३ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी संबंधित जिल्ह्यांना दिला आहे.

ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.

Sugarcane Labor
Sugarcane Labor : तीन वर्षे ऊसतोड केलेल्या कामगारांनी ओळखपत्रासाठी नोंदणी करावी

त्या अंतर्गत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादमांसाठी अपघात विमादेखील प्रस्तावित केला आहे. मात्र या विमा योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी अवधी लागत असल्याने सध्या अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबे वारसांना तातडीने रुपये ५ लाखाची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Sugarcane Labor
Sugarcane Labor Shortage : यंदा ऊसतोडीसाठी मजूर टंचाईची शक्यता कमी

त्यानुसार लाभार्थ्यांना त्या त्या जिल्ह्याचे मंत्री, पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याबाबतचा धनादेश लवकरच वारसांना देण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिनेश डोके व व्यवस्थापक बाळासाहेब सोळंकी यांनी या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला होता.

...या कारणांसाठी मिळणार मदत

रस्ते, रेल्वे अपघातात मृत्यू

पाण्यात बुडून मृत्यू

विजेचा धक्का बसल्यामुळे मृत्यू

वीज पडून, उंचीवरून पडून मृत्यू

जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांनी विषबाधा होऊन मृत्यू

सर्पदंश, विंचूदंश, जनावराने चावा घेणे, रेबीज, कोणत्याही प्राण्याने जखमी केल्यामुळे अपंगत्व येणे किंवा मृत्यू येणे

नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या

दंगलीतील अपंगत्व अथवा मृत्यू, खून

आगीमुळे झालेला अपघात व अन्य कोणताही अपघात

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com