
Sugarcane Juice Powder Research : उसाचा रस हा आरोग्यासाठी गुणकारी असल्याने प्रत्येकजण याचा आस्वाद घेत असतात. परंतु, उसाचा रस फक्त गळीत हंगामाच्या काळात मिळत असतो. उसाचा रस १२ महिने मिळावा यासाठी हरियाणातील कर्नाल ऊस संशोधन केंद्राने एक संशोधन केले आहे.
कर्नाल ऊस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी उसाच्या रसाची पावडर तयार केली आहे. या पॅकेट बंद पावडरची वैधता उत्पादनाच्या तारखेपासून ६ महिने असणार आहे.
ऊस संशोधन संस्थेच्या कर्नाल प्रादेशिक केंद्राचे अध्यक्ष डॉ. एम. एल. छाबरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यूस पावडरच्या पॅकेटमध्ये २०० मिली पाणी मिसळून उसाचा ताजा रस तयार करता येतो. ऊस संशोधन संस्थेचे डॉ. के. हरी आणि इतर शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे ही पावडर तयार केली आहे.
शास्त्रज्ञांची टीम यावर बराच काळ काम करत होती. पुरेशा चाचण्याही करण्यात आल्या आहेत. ही ज्यूस पावडर केवळ नैसर्गिकच नाही तर लिंबाच्या चवीमध्येही उपलब्ध असेल. उसाच्या रसाची पावडर पोषक तत्वांनी परिपूर्ण असून लवकरच बाजारात उपलब्ध होईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
रस पावडर संशोधनातील प्रमुख डॉ. छाबरा म्हणाले की, "शास्त्रज्ञांनी उसाच्या रसातील पोषक तत्वांचीही पूर्ण काळजी घेतली असल्याचे सांगण्यात आले. सध्या ही पाकिटे ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मात्र, संस्थेने खासगी कंपनीसोबत हे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याचा करार केला आहे. उसाच्या रसाची पावडर बनवून शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे उसाचा वापर आणि किंमत दोन्ही वाढेल". असा विश्वास डॉ. छाबरा व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.