Kolhapur Sugarcane Season FRP : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची एफआरपी जाहीर; शेतकरी संघटनांचा विरोध

Kolhapur Rajaram Sugar Factory :कोल्हापूरमधील इतर कारखान्यांच्या तुलनेत कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याने सर्वांत कमी म्हणजे प्रतिटन ३ हजार ०५० रुपये एफआरपी दिली आहे.
Kolhapur Sugarcane Season FRP
Kolhapur Sugarcane Season FRPagrowon
Published on
Updated on

Kolhapur Sugarcane FRP : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची यंदाच्या गळीत हंगामासाठी एफआरपी जाहीर केली आहे. यामध्ये पंचगंगा सहकारी, कुंभी-कासारी, दालमिया आसुर्ले -पोर्ले, या साखर कारखान्यांनी सर्वाधिक ३ हजार ३०० रुपये एफआरपी जाहीर केली. तर इतर कारखान्यांच्या तुलनेत कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याने सर्वांत कमी म्हणजे प्रतिटन ३ हजार ०५० रुपये एफआरपी दिली आहे.

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे कारखान्याने ३ हजार १०० अद्यापही एफआरपी जाहीर केलेली नाही. प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनीही ही याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

जिल्ह्यातील १६ सहकारी व सात खासगी, असे एकूण २३ साखर कारखाने आहेत. सर्व साखर कारखाने सध्या सुरू आहेत. दरम्यान, २०२४-२५ चा गळीत हंगाम सुरू झाला असून, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी त्यांच्या साखर कारखान्यांच्या साखर उताऱ्यानुसार एफआरपी जाहीर केली आहे. तर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफआरपीपेक्षा जास्त दर द्यायचा असेल, तर वृत्तपत्रात जाहिरात देणे बंधनकारक आहे. त्यासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याच्याही सूचना केल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयास जोरदार विरोध केला आहे. शेट्टी म्हणाले "जिल्हाधिकारी व साखर सहसंचालक हे कारखानदारांच्या हातातील बाहुले आहेत. वास्तविक पाहता जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी जाहीर केलेला दर हा एफआरपीपेक्षा कमी आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कायद्याचा आधार घेऊन साखर कारखानदार सोयीनुसार दर जाहीर करत आहेत, हे आम्हाला मान्य नाही. यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून, स्वाभिमानीने केलेल्या मागणीप्रमाणे पहिली उचल ३ हजार ७०० रुपये देण्याबाबत कारखानदारांची व संघटनांची तातडीने बैठक लावावी. अन्यथा गंभीर परिणामांना शासन व कारखानदारांना सामोरे जावे लागेल." अशी शेट्टी यांनी सांगितले.

Kolhapur Sugarcane Season FRP
Kolhapur Sugarcane Factory Fraud : कोल्हापुरातील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्यात २९ कोटींचा गैरव्यवहार उघड

कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी जाहीर केलेली एफआरपी

आजरा (आजरा) ३ हजार १००, भोगावती (परिते) ३ हजार २००, छत्रपती राजाराम (कसबा बावडा) ३ हजार ५०, छत्रपती शाहू (कागल) ३ हजार १००, दत्त (शिरोळ) ३ हजार १४०, दूधगंगा-वेदगंगा (बिद्री) ३ हजार २००, जवाहर (हुपरी) ३ हजार १५०, सदाशिवराव मंडलिक (हमीदवाडा) ३ हजार १००, कुंभी-कासारी (कुडित्रे) ३ हजार ३००, पंचगंगा (इचलकरंजी) ३ हजार ३००, शरद सहकारी (नरंदे) ३ हजार १५०, वारणा (वारणानगर) ३ हजार २२०, अथणी शुगर (सोनवडे-बांबवडे) ३ हजार २२०.

डॉ. डी. वाय. पाटील (गगनबावडा) ३ हजार १५०, दालमिया (आसुर्ले-पोर्ले) ३ हजार ३००, गुरुदत्त शुगर्स (टाकळीवाडी) ३ हजार १५०, इको केन (चंदगड) ३ हजार १००, ओलम ग्लोबल (राजगोळी खुर्द) ३ हजार १००, सरसेनापती संताजी घोरपडे (कापशी) ३ हजार १००, ओमकार शुगर (फराळे, राधानगरी) ३ हजार २००, अथणी शुगर (तांबाळे) ३ हजार १००, अथर्व (चंदगड) ३ हजार १००, आप्पासाहेब नलवडे (गडहिंग्लज) ३ हजार १००.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com