Chhatrapati Sambhajinagar News : येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी २९ नोव्हेंबर अखेरपर्यंत १६ लाख ६८ हजार ९९७ टन उसाची गाळप करत ११ लाख २५ हजार ९७९ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ६.८७ टक्के इतका राहिला.
यंदा कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला असला, तरी बहुतांश भागात ऊस उत्पादनात येणारी घट कारखान्यांची डोकेदुखी वाढविणारी आहे. त्यामुळे कारखाने अपेक्षित कालावधीपर्यंत चालतील की नाही हाही प्रश्न आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या पाच जिल्ह्यात एकूण २२ कारखान्यांनी ऊस गाळपास सुरुवात केली आहे.
त्यामध्ये १३ सहकारी तर ९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. १३ सहकारी कारखान्यांची प्रतिदिन ऊसगाळप क्षमता ४३ हजार ९०० टन असून ९ खासगी कारखान्यांची प्रतिदिन ऊसगाळप क्षमता ४८ हजार टन इतकी आहे.
१३ सहकारी साखर कारखान्यांनी आतापर्यंत ८ लाख ६७ हजार ४७७ टन ऊस गाळप केला असून, सरासरी ६.४५ टक्के साखर उताऱ्याने ५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. दुसरीकडे खाजगी ९ कारखान्यांनी ८ लाख १ हजार टन उसाचे गाळप करत सरासरी ५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
गाळप स्थिती...
जिल्हानिहाय कारखाने, ऊस गाळप (टन), साखर उत्पादन (क्विंटल), उतारा (टक्का)
जिल्हा नंदुरबार
कारखाने २
सहकारी १
खासगी १
ऊस गाळप १ लाख ३५ हजार ८९१
साखर १ लाख ०१ हजार ४४२
उतारा ७.४६
जिल्हा जळगाव
कारखाने २
सहकारी १
खासगी १
ऊस गाळप ६२ हजार ९४८
साखर ४२ हजार २७५
उतारा ६.७२
जिल्हा छत्रपती संभाजीनगर
कारखाने ६
सहकारी ३
खासगी ३
ऊस गाळप ३ लाख ४१हजार ८०३
साखर २ लाख ५८ हजार ४२५
उतारा ७.५६
जिल्हा जालना
कारखाने ५
सहकारी ३
खासगी २
ऊस गाळप ४ लाख ३१ हजार ४७२
साखर ३ लाख २३ हजार ०८५
उतारा ७.४९
जिल्हा बीड
कारखाने ७
सहकारी ५
खासगी २
ऊस गाळप ६ लाख ९६ हजार ८८२
साखर ४ लाख २० हजार ७५२
उतारा ६.०४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.