Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीला गती नाहीच

Sugarcane Season : आडसाली हंगामातील ऊस लागवडीला अतिपावसाचा फटका बसल्याने अपेक्षित वाढ नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
Sugarcane Cultivation
Sugarcane CultivationAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात आडसाली हंगामातील ऊसलागवड पूर्ण झाली आहे. पावसाने उघडीप दिली असल्याने पूर्व हंगामातील ऊसलागवड सुरू झाली आहे. मात्र, पूर्वहंगामातील ऊस लागवडीला वाफसा नसल्याने लागवडीसाठी शेतकरी पुढे येत नाहीत.

त्यातच पुन्हा मुसळधार पावासचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असल्याने लागवडीला फारशी गती नसल्याचे चित्र आहे. आडसाली हंगामातील ऊस लागवडीला अतिपावसाचा फटका बसल्याने अपेक्षित वाढ नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation : सांगलीत पावसामुळे ऊस लागवड खोळंबली

जिल्ह्यात जुलै अखेर २२ हजार ७५४ हेक्टरवर आडसाली हंगामातील ऊस लागवड झाली आहे. जून, जुलैमध्ये अतिपाऊस झाल्याने या हंगामातील उसाला फटका बसला आहे. उसाची उगवण, तूट आणि अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे शेतकरी संटकात सापडला आहे. आडसाली हंगामातील ऊसलागवड आटोपली आहे. आडसाली हंगामातील क्षेत्र घट झाली आहे की वाढले आहे, येत्या पंधरा ते वीस दिवसांत स्पष्ट होईल.

Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation : उसाच्या आगारात ऊस लागवडीत वाढ

सध्या पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे पूर्वहंगामातील ऊस लागवड करण्यासाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे. मात्र, अजूनही ऊस लागवडीसाठी वाफसा नसल्याने शेतकरी वाफसा येण्याची प्रतीक्षा करत आहेत.

त्यातच दोन दिवसांपासून पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे ऊसलागवड करायची की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

अतिपावसामुळे गेल्या दोन महिन्यांत शेतात अद्याप वाफसा नाही. त्यामुळे पूर्वहंगामातील ऊस लागवडीचे नियोजन केले नाही. वाफसा आल्यानंतर ऊसलागवड करणार आहे.
- तात्यासो नागावे, खटाव, ता. पलूस

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com