Sugarcane Cultivation : सांगलीत पावसामुळे ऊस लागवड खोळंबली

Sugarcane Farming : सांगली जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील आडसाली ऊस लागवड सुरू झाली असून आतापर्यंत २२ हजार ७५४ हेक्टरवर लागवड आहे.
Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील आडसाली ऊस लागवड सुरू झाली असून आतापर्यंत २२ हजार ७५४ हेक्टरवर लागवड आहे. जून आणि जुलैमध्ये जोरदार पाऊस झाला. मात्र, या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने उसाची वाढ खुंटली आहे. तसेच ऊस लागवडही खोळंबली असून लागवड लांबणीवर पडणार आहे.

जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठी मे महिन्याच्या आठवड्यापासून आडसाली हंगामातील ऊस लागवड सुरू होते. जिल्ह्यातील इतर भागात जूनच्या मध्यापासून शेतकरी ऊस लागवडीचे नियोजन करतो. यंदा जूनच्या मध्यापासून शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी प्रारंभ केला. दरम्यान जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातपर्यंत पावसाने उघडीप दिली. यादरम्यान आडसाली हंगामातील ऊस लागवड शेतकऱ्यांनी केली.

Sugarcane Farming
Sugarcane Farming : अभ्यासूवृत्तीने वाढवली उसाची उत्पादकता

ऑगस्टच्या मध्यापर्यंत २२ हजार ७५४ हेक्टर ऊसलागवड झाली आहे. जूनमध्ये २२६ मिलिमीटर तर जुलैत २८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात प्रामुख्याने जुलै आणि ऑगस्टपर्यंत आडसाली ऊसलागवड केली जाते. मात्र वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या भागात जूनमध्ये पाऊस झाला तर लागवड करता येत नाही त्यामुळे मेच्या शेवटच्या आठवड्यात ऊस लागवड होते.

Sugarcane Farming
Sugarcane Cultivation : सोलापुरात उसाचे क्षेत्र ६० हजार हेक्टरने घटले

जून आणि जुलैमध्ये सतत पाऊस असल्याने शेतात पाणी साचून आहे. त्यामुळे वाफसा नाही. परिणामी शेतकऱ्यांना ऊसलागवड करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यातच या पावसामुळे अगोदर केलेल्या ऊस लागवडीला अपेक्षित फुटवे, तुटाळी होत आहे. उगवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये लागवड होणाऱ्या क्षेत्रांमध्ये घट होणार आहे. तसेच ऑगस्टमध्ये होणारी लागवड शेतकऱ्यांनी थांबवली आहे. आडसाली लागवडीचा हंगाम जुलै ते ऑगस्टपर्यंत असतो. जास्तीत जास्त सप्टेंबरच्या मध्यापर्यंत लागवड होते. यावर्षी सप्टेंबरपासून लागवडीला गती येईल.

तालुकानिहाय ऊसलागवड दृष्टिक्षेप (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

मिरज २२३४०

जत ३०

खानापूर ३०५५

वाळवा ९११८

तासगाव २३८१

शिराळा ८७०

आटपाडी ९

कवठे महांकाळ १३३

पलूस १६७२

कडेगाव ३२४६

एकूण २२७५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com