Sugarcane Cultivation : उसाच्या आगारात ऊस लागवडीत वाढ

Sugarcane Farming : उसाच्या आगारात आतापर्यंत आडसाली उसाच्या ९७ हजार ६०१ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत.
Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation Agrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या तीन महिन्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणे विभागात ऊस लागवडीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उसाच्या आगारात आतापर्यंत आडसाली उसाच्या ९७ हजार ६०१ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. येत्या काळात पावसाने उघडीप दिल्यास पूर्वहंगामी, सुरू उसाच्या लागवडी होऊन क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

यंदा विभागातील पुणे जिल्ह्याच्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत पावसाने जोरदार हवेली लावली. नगर जिल्ह्यातही बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यातील पानशेत, पवना, कळमोडी, चासकमान, नीरा देवघर अशी काही धरणे शंभर टक्के भरली. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या उजनीत शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे.

Sugarcane Cultivation
Sugarcane Farming: कमी खर्चात ऊस लागवड करणारे यंत्र

नगर जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा धरण भरले आहे. या धरणामुळे पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता झाली असल्याने आगामी काळात भासणारी पाणीटंचाई कमी होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीवर भर दिला आहे.

गेल्या वर्षी याच काळात उसाच्या आगारात आडसाली उसाच्या अवघ्या ८२ हजार २१८ हेक्टरवर लागवडी झाल्या होत्या. चालू वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १५ हजार ३८३ हेक्टरने वाढ झाली आहे.

इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक हे शाश्वत उत्पन्न म्हणून पाहिले जाते. त्यामुळे बहुतांशी शेतकरी दर वर्षी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत आडसाली उसाच्या लागवडी करतात. या लागवडीचा हंगाम संपून पूर्वहंगामी व सुरू उसाच्या लागवडी सुरू होतील. यंदा जून आणि जुलै महिन्यांत चांगला पाऊस झाला.

Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation : सोलापुरात उसाचे क्षेत्र ६० हजार हेक्टरने घटले

दर वर्षी शेतकरी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू अशा तीन हंगामात उसाच्या लागवडी करतात. पुणे विभागात उसाचे एकूण सरासरी तीन लाख ६१ हजार ५३८ हेक्टरवर क्षेत्र आहे. विभागातील नगर जिल्ह्यात शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, श्रीरामपूर, जामखेड, संगमनेर, राहाता या महत्त्वाच्या तालुक्यांत बऱ्यापैकी लागवडी झाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौड, बारामती, इंदापूर, हवेली, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत लागवडी झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा या तालुक्यांत उसाच्या लागवडी झाल्या आहेत.

जिल्हानिहाय आडसाली उसाच्या झालेल्या लागवडी (क्षेत्र, हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र आडसाली ऊस लागवड

नगर ९४,६९३ १४,७०१

पुणे १,३५,२१७ ६३,६३८

सोलापूर १,३१,६२८ १९,२६३

एकूण ३,६१,२३८ ९७,६०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com