Sugarcane Season : १ नोव्हेंबरपासून पेटणार साखर कारखान्यांची धुराडी ; मंत्री समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

Agriculture News : राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon

Sugarcane Crushing Season : यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे ऊसाच्या क्षेत्रामध्ये मोठी घट झाली आहे. तसेच पाण्याची पातळी घटल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राज्यात ऊस गाळप हंगामास लवकर करण्याची मागणी होत होती. दरम्यान, आज मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली. यात १ नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्री समितीची बैठक झाली. या बैठकीत सर्व कॅबिनेट मंत्री उपस्थित होते.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Season : अखेर मुहूर्त सापडला ! गळीत हंगाम सुरू करण्याबाबत मंगळवारी मंत्री समितीची बैठक

अनेक ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा जाणवून लागल्याने ऊसाचा चाऱ्यासाठी वापर होत आहे. त्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने ऊसाचा गळीत हंगाम चालणार आहे. यंदा साखर उत्पादनात मोठी टक्के घट होण्याची शक्यता असून सुमारे ८९ लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी राज्यातील २११ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. यंदा साखर आयुक्त कार्यालयाकडे २१७ साखर कारखान्यांनी ऊस हंगाम सुरु करण्यासाठी अर्ज केला आहे.

राज्यातील १५ जिल्ह्यांमधील ३९ साखर कारखान्यांनी मागील तीन वर्षात शेतकऱ्यांची तब्बल १ हजार ४८३ कोटी ८० लाख ११ हजार रुपयांची एफआरपी थकवली आहे. याप्रकरणी साखर आयुक्तालयाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना महसुली वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपी अधिक ४०० रुपयांचा हप्त्याची मागणी केली आहे. त्यासाठी राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून आक्रोश पदयात्रा सुरू केली आहे. तर दुसरीकडे ऊस तोड कामगारांनी मजुरी, वाहतूकच्या दरात वाढ करण्याची मागणीसाठी १ नोव्हेंबरपासून संपाची हाक दिली आहे. यावर सरकार कसा तोडगा काढणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com