Sugarcane Crushing : एकोणीस कारखान्यांकडून २२ लाख टन उसाचे गाळप

Sugar Market : मराठवाड्यातील तीन व खानदेशातील दोन जिल्ह्यांतील एकूण १९ कारखान्यांनी २० डिसेंबरपर्यंत २२ लाख १६ हजार ६०४ टन उसाचे गाळप करत १५ लाख ३८ हजार ८५ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याचे माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील तीन व खानदेशातील दोन जिल्ह्यांतील एकूण १९ कारखान्यांनी २० डिसेंबरपर्यंत २२ लाख १६ हजार ६०४ टन उसाचे गाळप करत १५ लाख ३८ हजार ८५ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याचे माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली. या सर्व कारखान्यांचा सरासरी साखर उत्पादन ६.९४ टक्के इतका राहिला आहे.

यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी सुमारे २१ कारखाने पुढे आले होते. त्यापैकी २० डिसेंबर अखेरपर्यंत १९ कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळप हंगामात सहभाग घेतला. त्यामध्ये नंदुरबार, जळगाव मधील प्रत्येकी एक जालन्यातील चार, छत्रपती संभाजीनगरमधील सहा व बीडमधील कारखान्यांचा समावेश आहे. या १९ कारखान्यांमध्ये ११ सहकारी तर आठ खासगी कारखाने आहेत.

Sugar Factory
Sugarcane Crushing : मोहोळमधील कारखान्यांत ४ लाख टन ऊस गाळप ; एकरी वजनाचा उतारा कमी; शेतकऱ्यांचे नुकसान

११ सहकारी कारखान्यांनी २० डिसेंबर अखेरपर्यंत ८ लाख १२ हजार ६४३ टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी ६.७७ टक्के साखर उताऱ्याने ५ लाख ५० हजार २९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. दुसरीकडे ८ खासगी कारखान्यांनी १४ लाख ३ हजार ९६१ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.०४ टक्के साखर उताऱ्याने ९ लाख ८७ हजार ७९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

Sugar Factory
Sugar Industry : गाळप सुरू, उसाचा दर मात्र कळेना

साखर विभागाच्या माहितीनुसार ऊस गाळप व साखर उत्पादन...

नंदुरबार : जिल्ह्यातील एका कारखान्याने २ लाख ३७ हजार ६४० टन उसाचे गाळप करत सरासरी ५.१ टक्के साखर उताऱ्याने १ लाख २१ हजार ३५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जळगाव : ल्ह्यातील एका कारखान्याने ४०३१ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.९३ टक्के साखर उतारा राखत ४१ हजार ९७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी ४ लाख ६५ हजार ५१५ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.७१ टक्के साखर उताऱ्याने ४ लाख ५ हजार ४१५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जालना : जिल्ह्यातील चार कारखान्यांनी ५ लाख १५ हजार २८ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.७७ टक्के साखर उतारा राखत ४ लाख ११० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

बीड : जिल्ह्यातील सात कारखान्यांनी लाख ५८ हजार ९० टन उसाचे गाळप करत सरासरी ६.०५ टक्के साखर उताऱ्याने ५ लाख ७९ हजार २८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com