Sugarcane Crushing : एक कोटी टनांपर्यंत उसाचे गाळप होण्याचा यंदा अंदाज

Sugar Production : अहिल्यानगर विभागात स्थिती; एक लाख ५३ हजार हेक्टर ऊस उपलब्ध
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon
Published on
Updated on

Aahilyanagar News : अहिल्यानगर ः अहिल्यानगर विभागातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत २४ साखर कारखान्यांच्या हद्दीत यंदा एक लाख ५३ हजार हेक्टर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. यंदा एक कोटी टनांच्या जवळपास उसाचे गाळप होईल, असा अंदाज प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने व्यक्त केला आहे. विभागात आतापर्यंत २६ लाख टनांच्या जवळपास उसाचे गाळप झाले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात वीस व नाशिक जिल्ह्यात चार साखर कारखान्यांच्या माध्यमातून उसाचे गाळप सुरू आहे. अहिल्यागरला ९४ हजार ७५० टन, तर नाशिकला ९ हजार टन अशी विभागात १ लाख ५ हजार ५०० टन गाळप क्षमता आहे. सध्या विभागात एक लाख टनांपर्यंत गाळप होत असून ८० हजार क्विंटलच्या जवळपास साखर उत्पादन होतेय.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing : नांदेड विभागात एक कोटी टन उसाचे गाळप

आतापर्यंत विभागात २६ लाख टनाच्या जवळपास गाळप झाले असून, २२ लाख क्विंटलच्या जवळपास साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उताराही तसा कमीच आहे. साखर गाळपात आतापर्यंत खासगी असलेल्या इंडिकॉन डेव्हलपर्स (अंबालिका) कारखान्याने तर सहकारीत मारुतराव घुले कारखान्याने आघाडी घेतली आहे. यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ६५९ तर नाशिक जिल्ह्यात १० हजार ६१४ हेक्टरवर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे.

विभागाचा विचार केला, तर आडसाली ३६७२३, पूर्वहंगामी २९७१०, सुरू २४,१३८, तर खोडवा ६२७६७ हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. नेवासा तालुक्यात सर्वाधिक ३० हजार ५५४, त्यापाठोपाठ श्रीगोंद्यात २६४४३, कर्जतमध्ये १५ हजार १३८, राहात्यात १८ हजार २४६, राहुरी १० हजार ७०७ हेक्टर क्षेत्र आहे. सरासरी उसाचे हेक्टरी ७० टनांपर्यंत उत्पादन निघते. याचा विचार केला तर एक कोटी टनांच्या जवळपास गाळप होईल, असा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने अंदाज व्यक्त केला आहे.

ऊसदर जाहीर कधी होणार?
अहिल्यानगर विभागात उसाचे गाळप सुरू असून बहुतांश कारखाने सुरू आहेत. आता साखर कारखाने सुरू होऊन महिना उलटला आहे. मात्र अद्याप एकाही साखर कारखान्याने उसाचा दर जाहीर केला नाही. शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या बाबत गप्प आहेत. साखर कारखाने उसाचा दर जाहीर कधी करणार या बाबत शेतकऱ्यांना प्रश्‍न पडला आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयही या बाबत बोलायला तयार नाही. विशेष म्हणजे ऊसदराबाबत बैठका घेतल्या जात नाहीत. काय उपाययोजना केल्या या बाबतही प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय सांगत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com