Sugar Sales Quota : साखरेचा विक्री कोटा झाला कमी, साखरेच्या दरातील घसरणीने कारखानदारांची कोंडी?

Indian Market Sugar Rate : साखर उपलब्ध आहे पण डिमांड नाही सध्या अशी परिस्थिती आहे. दसरा, दिवाळीला जी अपेक्षित साखर उचल व्हायला हवी होती ती झाली नसल्याने दर कमी होत आहेत.
Sugar Sales Quota
Sugar Sales QuotaAgrowon
Published on
Updated on

Sugar Sales Quota India : दिवाळीच्या पार्श्वभूमिवर घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली आहे. प्रतिक्विंटल ३ हजार ६५० रूपये असणारा दर अचानक ३ हजार ४५० रूपयांपर्यंत आला आहे. याचबरोबर नोव्हेंबर-२०२४ चा विक्री कोटाही कमी झाला आहे. ऑक्टोबर महिन्याचा साखरेचा विक्री कोटा २५ लाख टन होता तो नोव्हेंबर महिन्यात २२ लाख टनांवर आला आहे. ३ लाख टनांचा विक्री कोटा कमी करण्यात आला आहे.

यंदा साखरेला मागणी चांगली राहिल्याने दरही चांगला मिळत होता. सप्टेंबरपर्यंत सरासरी ३ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत साखरेचा दर होता. मात्र, सध्या ३ हजार ४५० रुपयांपर्यंत खाली आला आहे. शासनाने ऑक्टोबरमध्ये २५ लाख टन साखर विक्रीचा कोटा साखर कारखान्यांना दिला होता. मात्र, त्यातील २० टक्के साखर अजूनही कारखान्यांकडे शिल्लक आहे. तोपर्यंत, नोव्हेंबरचा कोटा जाहीर करण्यात आला आहे.

सध्या घाऊक बाजारात ३ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. मागील तीन महिन्यांतील साखरेच्या दराची सरासरी काढून त्यातील ८५ टक्के रक्कम बँका कारखान्यांना ऊस बिलापोटी देतात. तीन महिन्यांचा सरासरी दर आणि बँकांकडून मिळणारी उचल पाहिली तर कारखान्यांना तीन हजार रुपये मिळू शकतात. त्यामुळे अनेक कारखान्यांपुढे आगामी काळात एफआरपी देण्यावरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sugar Sales Quota
Kolhapur Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यात डझनभर साखर कारखानदार उतरणार विधानसभेच्या रिंगणात, गळीत हंगामावर परिणामाची शक्यता

दरवाढीच्या भीतीने साखरेचा साठा श्रावण व गणेशोत्सवाच्या काळात साखरेला तेजी होती, आगामी दसरा व दिवाळीत साखर आणखी उसळी घेणार, अशी भीती व्यापाऱ्यांना वाटल्याने त्यांनी कोटा कमी केला, त्याचा परिणाम सध्या दिसत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

साखर तज्ज्ञ विजय औताडे म्हणाले की, गेल्या दोन तीन महिन्यात शासनाने कोटा जास्त दिला होता. सण असल्याने साखर कोटा संपूण जात होता. परंतु या महिन्यात सण असूनही साखर शिल्लक राहिली. तसेच आगामी काळात थंडीमुळे शित पेयांसाठीची साखर मागणी कमी होण्याची शक्यता आहे.

साखर उपलब्ध आहे पण डिमांड नाही सध्या अशी परिस्थिती आहे. दसरा, दिवाळीला जी अपेक्षित साखर उचल व्हायला हवी होती ती झाली नसल्याने दर कमी होत आहेत. साखर कारखान्याकडे साखरेचा साठा शिल्लक आहे, त्यामुळे उर्वरित साखर खपवायची कशी हा प्रश्न असल्याचे मत साखर तज्ज्ञ विजय औताडे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com