Beed News : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात गेल्या पाच दिवसांपासून पाऊस उघडला असून मांजरा धरण भरल्याने मोठ्या उत्साहाने शेतकरी ऊस लागवडीच्या कामात मग्न झाले आहेत. मशागतीच्या कामाने आता वेग घेतला आहे.
धानोरा परिसर हा उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यात मांजरा धरण भरल्यास ७० ते ८० टक्के ऊस क्षेत्र होते. यंदाही मांजरा धरण भरले असून शेतकरी मोठ्या उत्साहाने मशागत करून नगदी पैशाचे पीक म्हणून ऊस लागवडीवर भर दिला आहे.
सध्या शेतातील सोयाबीन मळणीचे काम जोरात सुरू असून सोयाबीन मळणी होताच मशागत करून ऊस लागवडीचे नियोजन शेतकरी करत आहेत. मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. पुढील वर्षी ऊस लवकर कारखान्याला जावा, उसाची तारीख लवकरच लागावी, यासाठी शेतकरी धडपड करत आहेत.
यावर्षी अधिक पाऊस झाल्याने सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहेत. पुढील वर्षी तरी उसाचे चांगले उत्पादन मिळेल व भरपाई होईल, या आशेने शेतकरी ऊस लागवडी करत आहेत. नॅचरल शुगर परिसरात दोन हजार हेक्टरच्या जवळपास ऊस लागवड झाली आहे.
लागवडीसाठी परराज्यातील मजूर
ऊस लागवडीसाठी गावातील व स्थानिक मजूरांची संख्या ही कमी पडत आहे. जादा पैसे देऊनही स्थानिक मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना एकत्र येत मध्यप्रदेशसह इतर राज्यातील मजूर आणून उसाची लागवड करावी लागत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.