Sugar Rate : साखर दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न

Control sugar Price : कोणत्याही परिस्थितीत साखरेच्या किमती देशांतर्गत बाजारात वाढू नयेत यासाठी केंद्राने सप्टेंबरसाठी अधिक कोटा जाहीर केला आहे. सध्या साखरेचा बाजार नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्राची धावपळ सुरू आहे.
Sugar Export
Sugar Export Agrowon
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : केंद्राने देशातील साखर कारखान्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री करण्यासाठी पंचवीस लाख टनांचा विक्री कोटा दिला आहे. आठ दिवसांपूर्वीच केंद्राने दोन लाख टनांचा अतिरिक्त कोटा कारखान्यांना दिला होता. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत हा साखर कोटा दीड लाख टनांनी जादा आहे. तर गेल्या महिन्याच्या तुलनेत हा विक्री कोटा पन्नास हजार टनांनी अधिक आहे. कोणत्याही परिस्थितीत साखरेच्या किमती देशांतर्गत बाजारात वाढू नयेत यासाठी केंद्राने सप्टेंबरसाठी अधिक कोटा जाहीर केला आहे. सध्या साखरेचा बाजार नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्राची धावपळ सुरू आहे.

Sugar Export
Sugar Market Rate : साखरेचे दर वाढू नये, यासाठी केंद्राची सावध पावले

पुढील हंगामात साखरेच्या उत्पन्नात घट अपेक्षित आहे. सध्याही देशात अतिरिक्त साखर शिल्लक नाही. बाजारात येथून पुढील काळात साखरेला मोठी मागणी अपेक्षित आहे. यामुळे केंद्राने या कालावधीत जास्तीत जास्त साखर विक्री कारखान्यांनी करावी जेणेकरून बाजारात साखरेची टंचाई निर्माण होणार नाही. या अपेक्षेने साखरेचे कोटे वाढवून दिले आहे. ऑगस्टमध्ये जुलैचा कोटा पंधरा दिवस वाढवून दिला, तर ऑगस्टच्या अंतिम टप्प्यात दोन लाख टनांनी पुन्हा साखर कोटा वाढवून दिला. सध्या साखर कारखान्यांनी मागणी येईल तशी साखर सावधगिरीने विक्री करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. अद्यापही सणांसाठीची मागणी फारशी नसल्याचे कारखानदारांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या दरम्यान मागणी सुरू झाल्यानंतर ती दिवाळीपर्यंत कायम राहील, असा अंदाज कारखानदारांचा आहे.

Sugar Export
Ethenol Rate : इथेनॉल दर न वाढविल्यास तूट कायम राहणार ; साखर उद्योगातील जाणकारांचा दावा

साखर दरावर केंद्राचे बारीक लक्ष

महाराष्ट्र, कर्नाटकात यंदा हंगाम काहीसा उशिरा सुरू होईल असा अंदाज आहे. प्रत्येक वर्षी देशपातळीवर ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू केला जातो. यंदा प्रमुख ऊस उत्पादक राज्यातील हंगाम नोव्हेंबरच्या उत्तरार्धात सुरू होण्याची शक्यता आहे. नवी साखर बाजारात येण्यास अद्यापही अडीच महिन्याचा कालावधी असणार आहे. या दृष्टीने केंद्राला साखर विक्रीचे नियोजन करावे लागणार आहे. केंद्र सध्या शिल्लक साखरेची काटेकोरपणे माहिती घेत आहे. साखरेचे दर कोणत्याही परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ नयेत याकडे आमचे बारीक लक्ष असल्याचे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com