Sugar Market Rate : साखरेचे दर वाढू नये, यासाठी केंद्राची सावध पावले

Suger Market Update : जूनसाठी २३.५ लाख टनांचा साखर विक्री कोटा
Sugar Rate
Sugar Rate Agrowon

राजकुमार चौगुले ॲग्रोवन वृत्तसेवा
Kolhapur Sugar Market News : केंद्राने देशातील साखर कारखान्यांना जूनसाठी २३.५ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे. गेल्या वर्षी जूनच्या तुलनेत अडीच लाख टनांनी कोटा वाढविण्यात आला आहे. तर गेल्या महिन्याच्या (मे) तुलनेत हा कोटा ५० हजार टनांनी घटविण्यात आला आहे.

कोणत्याही परिस्थितीत किरकोळ बाजारात साखरेचे दर (Sugar Rate) वाढू नये, यासाठीच जूनमध्येही कोटा जाहीर करताना खबरदारी घेण्यात आली आहे.

एप्रिलमध्ये दराची काहीशी तेजी अनुभवणाऱ्या कारखान्यांना मेमध्ये मात्र फारसा दिलासा मिळाला नाही. ऐन उन्हाळ्याच्या महिन्यातही साखर विक्रीला फारसा उठाव नव्हता. दरही ३३०० ते ३५०० च्या दरम्यान राहिले.

देशातील साखर उत्पादन कमी झाल्याने केंद्राच्या वतीने सावध पावले उचलली जात आहेत. साखर उत्पादन कमी झाल्याने याचा परिणाम साखरेचे किरकोळ बाजारातील दर वाढण्यावर होईल, अशी धास्ती केंद्राने घेतली आहे.

कोणत्याही परिस्थितीत दर हाताबाहेर जाणार नाहीत, यासाठी केंद्राने प्रत्येक निर्णय घेताना सावधगिरी बाळगली आहे. यामुळेच महिन्याचे कोटे जाहीर करताना अंदाज पाहूनच कोटे जाहीर केले जात आहेत.

Sugar Rate
Sugar Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर दबावात

नवा हंगाम सुरू होण्यास अजून चार महिन्यांचा कालावधी आहे. यंदा देशात अंदाजापेक्षा साखर उत्पादन कमी झाल्याने पुढील हंगामापर्यंत साखरेचा पुरवठा समान पातळीला बाजारपेठेत व्हावा, यासाठी केंद्राने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

याचा पहिला फटका निर्यातीला बसला आहे. पुढील वर्षाच्या उत्पादनाबाबतचे अंदाज अद्याप आले नाहीत. यामुऴे पुढील हंगाम सुरू होईपर्यंत तरी देशात साखरेचा मुबलक साठा असणे गरजेचे आहे. या दृष्टीनेच प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

Sugar Rate
Sugar Rate : जागतिक बाजारात साखरेचे दर चढेच राहण्याची शक्यता

केंद्र धोका पत्कारेना
यंदा अनेक साखर कारखान्यांना उद्दिष्टाइतक्या ऊस गाळपासाठी झगडावे लागले. उत्पादकता घटल्याने याचा नकारात्मक परिणाम साखर उत्पादनावर झाला.

यामुळे जरी पीक शेतात दिसत असले तरी उत्पादनाचे अंदाज मात्र साफ चुकल्याने केंद्र कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

साखरेच्या प्रकारानुसार दर स्थिती (प्रतिक्विंटल रुपये) (किमान कमाल)
राज्य...एस ३०...एम ३०
महाराष्ट्र...३३८५- ३३९५...३४८५-३४९५
कर्नाटक...३५५०-३५७५...३६२५-३६२५
गुजरात...३५०१-३५५१...३५८१-३६२१
मध्य प्रदेश...३५४५-३५८५...३६००-३६५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com