Sugar Production : सांगलीत साखरेचे उत्पादन ६२ लाख क्विंटल

Sugarcane Season 2025 : जिल्ह्यातील १७ पैकी १० कारखाने सहकारी तर ७ कारखाने खासगी आहेत. यंदा प्रथमच ऊस तोडणी मजुरांसह सुमारे ३०० हून अधिक ऊस तोडणी यंत्राचा वापर केला जात आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांकडून ६० लाख ६५ हजार ७०२ टन उसाचे गाळप झाले असून, ६२ लाख २० हजार ४६५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी उतारा १०.२६ टक्के आहे. उताऱ्यात ‘हुतात्मा’, तर गाळपात ‘सोनहिरा’ कारखाना आघाडीवर आहे.

जिल्ह्यातील १७ पैकी १० कारखाने सहकारी तर ७ कारखाने खासगी आहेत. यंदा प्रथमच ऊस तोडणी मजुरांसह सुमारे ३०० हून अधिक ऊस तोडणी यंत्राचा वापर केला जात आहे. जिल्ह्यात एक लाख ३७ हजार हेक्टर उसाची नोंद आहे.

Sugar Production
Sugar Production : ‘नॅचरल’चे उत्पादित सहा लाख साखर पोत्याचे पूजन

जिल्ह्यातील उपलब्ध उसापैकी सुमारे ७० टक्क्यांहून अधिक उसाचे गाळप झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळेही उसाची वाढ खुंटली आहे. यामुळे यंदा एकरी सरासरी उत्पादन घटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कर्नाटकातील कारखान्यांनी जिल्ह्यातील कारखान्यांपेक्षा पंधरा दिवस लवकर गाळप सुरू केले. शिवाय सध्याही सीमा भागातील साखर कारखाने जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणावर गाळपास नेत आहेत.

जिल्ह्यातील ऊसतोडी करणाऱ्या टोळ्या कमी झाल्या आहेत. तर तीनशेहून अधिक यंत्रांव्दारे तोडणी सुरू झालेली आहे. रस्त्याकडील ऊस नेण्यासाठी आता कारखान्यांची स्पर्धा सुरू आहे. यामुळे यंदा साखर कारखान्यांचा हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर संपण्याची चिन्हे आहेत.

Sugar Production
Sugar Production: साखर उत्पादनात घसरण सुरूच! जानेवारीअखेर १६५ लाख टन उत्पादन

उन्हाच्या तडाख्याचा परिणाम

यंत्राने ऊस तोडणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यासाठी किमान साडेचार फूट सरीची आवश्‍यकता असते. कमी रुंदी असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस तोडणीसाठी मजुरांची आवश्‍यकता आहे. सध्या उन्हाचा पारा वाढतोच आहे.

यामुळे पहाटे आणि सायंकाळच्या सत्रात मजूर काम करीत आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे ऊस तोड कमी होत आहे. बैलगाडी किंवा ट्रॅक्टरमध्ये कमी ऊस घालून गाळपास नेत असल्याचे चित्र आहे.

साखर कारखाना गाळप (टन) उत्पादन (क्विंटल) उतारा (टक्के)

श्री दत्त इंडिया ६५५५८० ६,८४,७७० १०.५४

राजारामबापू युनिट १ ४५८९०० ५,०७,३०० ११.२९

विश्‍वास चिखली ३५४७०० ४,२१,५०० ११.९१

हुतात्मा वाळवा ३६२५२० ३,९३,२२५ १२.५६

राजारामबापू युनिट २ ३,०१,८९० ३७३१०० १२.३८

एस ई झेड तूरची ४१३२० २२,८४० ७.४८

राजारामबापू युनिट ४ १,८५,६८५ २०३०६० १०.२६

सोनहिरा, वांगी ७४०५७५ ६,५९,१९० ८.९६

क्रांती अग्रणी, कुंडल ६,९२,२६० ७२३४६० १२.०२

राजारामबापू युनिट-३ २,१४,६३० २५२१६० १२.०४

मोहनराव शिंदे, आरग २,८७,९४० ३२५९५० ११.१८

दालमिया, कोकरूड ३,४५,७५० ४१८९५० १२.०२

यशवंत शुगर, नागेवाडी १,३८,२०० १५७९४० ११.४९

रायगाव शुगर १,२५,४९० १२४४०० १०.७६

उदगिरी, खानापूर ४,०९,८२६ ३००६५० ७.३७

सदगुरू श्रीश्री ४,५२,११६ ३३३०५० ७.३

श्रीपती शुगर, डफळापूर २९८३२० ३२८९२० ११.२१

एकूण ६०,६५,७०२ ६२,२०,४६५ १०.२६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com